राजकीय

‘दास माझ्या कॉलेजमध्ये इतिहास शिकलेत’ : शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीवरून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

दिल्ली : वृत्तसंस्था – उर्जित पटेल यांनी तडकाफडकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरेतर रिजर्व बँकेचे गव्हर्नर हे अर्थतज्ज्ञ किंवा किमान त्यांचे अर्थशास्त्रातील ज्ञान असणे अपेक्षित असते . पण मोदी सरकारने चक्क रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी इतिहासाचे पदवीधर असलेले दास यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मोदी सरकार सोशलवर चांगलेच ट्रोल झाले आहे.

दास यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतर मात्र सर्वत्र प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. नोटबंदीच्या काळामध्ये सरकारने घेतलेले निर्णय आणि रोज बदलणारे नियम पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम दास यांनी केले होते दरम्यान नोटबंदीच्या काळात सरकारी धोरणांचा चेहरा म्हणून दास यांच्याकडे पाहिले जायचे. दास यांची नियुक्ती गव्हर्नरपदी झाल्यानंतर नेटकऱ्यांनी याच पत्रकार परिषदांमधील व्हिडीओ क्लिप्स व्हायरल करत दास यांच्या नियुक्तीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. शक्तिकांत दास माजी अर्थ सचिव आहेत तसेच सध्या ते अर्थसचिव आहेत.

दरम्यान दास यांच्या नियुक्तीनंतर दास यांच्या संदर्भातील अनेक गोष्टी नेटकऱ्यांनी पोस्ट करत त्यांची नियुक्ती योग्य नसल्याचे मत मांडले आहे. एक सरकारी अधिकारी असणाऱ्या दास यांची थेट आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्याबद्दल अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जाताना दिसत आहे. मुख्य म्हणजे यासंदर्भात अनेक ट्वीट ट्वीटरवर व्हायरल होताना दिसत आहे. पाहूयात असेच काही व्हायरल झालेले ट्विटस

तर हे आहेत आपले नवीन गव्हर्नर

https://twitter.com/tinucherian/status/1072660856620679168

 

ला पडलेले भयंकर स्वप्नही यापेक्षा जास्त तर्कशुद्ध असते


दोन वर्षापूर्वी दास यांनी केलेले ट्विटस

रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांचे यांचा शिक्षण अर्थशास्त्रात झाले आहे. परंतु रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांच्याप्रमाणे दास यांचे शिक्षण अर्थशास्त्र विषयात झालेले नाही. महत्त्वाचे म्हणजे दास यांनी उद्योग अथवा अर्थशास्त्राशी संबंधित विषयात पदवीही मिळवलेली नाही असेही नेटकऱ्यांनी म्हटल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर काही जणांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदी विराजमान
होण्यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रतेचीही चर्चा केल्याचे दिसून आले.

दास माझ्या कॉलेजमध्ये इतिहास शिकलेत

मागील काही आरबीआय गव्हर्नसची शैक्षणिक पात्रता

एमए इन हिस्ट्री हाच योग्य उमेदवार
दरम्यान अनेकांनी दास यांचे शिक्षण किती झाले हेदेखील गुगलवर सर्च केले. दरम्यान दास यांच्या शिक्षणाबद्दल नेटवर भरमसाठ चर्चा होताना दिसून आली. गुगल सर्चच्या ग्राफमध्ये नेटकऱ्यांची दास यांचे शिक्षण जाणून घेण्याबद्दलची उत्सुकता दिसून येते.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published.

10 + 11 =