अशोक शेंडे हत्याप्रकरणातील दोघांना पिंपरीत अटक

अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाईन – शेतीच्या वादातून अशोक रभाजी शेंडे (रा. आडगाव, पाथर्डी, जि. नगर) यांचे अपहरण करून आरोपींनी खून केला होता. या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने पिंपरी परिसरातून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. चंद्रकांत आनंदा बर्फे (५२) व अमोल चंद्रकांत बर्फे (२०, रा. आडगाव, ता. पाथर्डी) अशी त्यांची नावे आहेत.

तक्रारदार राजू रभाजी शेंडे यांचे बंधू अशोक रभाजी शेंडे यांचे शेतीच्या वादातून अपहरण करून हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर तक्रारदार राजू शेंडे यांच्या फिर्यादीनुसार पाथर्डी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनेतील आरोपी पुण्यातील पिंपरी परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी चंद्रकांत आनंद बर्फे व अमोल चंद्गकांत बर्फे यांना पोलिसांनी अटक केली. जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मिना, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोसई. गणेश इंगळे, सुनिल चव्हाण, रवी सोनटक्के, सोन्याबापू नानेकर, संदिप घोडके, रविंद्र कर्डिले, रोहिदास नवगिरे, नामदेव जाधव, संदिप पवार व बबन बेरड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.