अल्पवयीन मुलांकडून अडीच लाखाचा ऐवज जप्त 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी, तळेगाव, लोणावळा आदी परिसरात वाहनचोरी तसेच लॅपटॉप चोरी करणा-या दोन अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच मोटारसायकल आणि तीन लॅपटॉप असा एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस मोहन नगर परिसरात गस्त घालत असताना दोन अल्पवयीन मुले दुचाकीवरून भरधाव वेगात जाताना आढळून आली. पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडून त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली. विचारपूस केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे समजले. त्यांच्याकडे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस कर्मचारी राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, महादेव जावळे, श्रीकांत जाधव, अजिनाथ सरक, जावेद बागसिराज, प्रतिभा मुळे, अविनाश देशमुख, उमेश वानखडे, रोहित पिंजरकर यांच्या पथकाने कसून चौकशी केली.

त्यांनी तळेगाव हद्दीत वाहन चोरी आणि लोणवळा हद्दीत लॅपटॉप चोरी केल्याचे समजले. त्यांच्याकडून पाच मोटारसायकल आणि तीन लॅपटॉप असा एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी, तळेगाव आणि लोणावळा पोलीस ठाण्यातील चोरी आणि घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.