लॉटरी सेंटरवर छापा टाकून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली शहरातील माधवनगर परिसरात असलेल्या रोहन ऑनलाईन लॉटरी सेंटरवरील जुगार आड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६६ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपाधीक्षक अशोक वीरकर यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be571034-cd73-11e8-b212-c9b3d83550f7′]

सेंटर चालक रवी संगाप्पा कांबळे (वय ३०), अनिल संगाप्पा कांबळे (वय -२८, दोघे रा. कर्नाळ रोड) तसेच जुगार लावण्यासाठी आलेले सावन मोहन केकडे (वय २४, रा. वसंतदादा कारखाना), विजय दिनकर भोरे (वय -२४ रा. चिंतामणीनगर), गणेश नारायण दुबळे (वय -२७ रा. वसंतदादा कारखाना वसाहत), महावीर विनायक कांबळे (वय – २५, रा. चिंतामणीनगर), प्रकाश सुरेश कोरे (वय -२५ रा. बुधगांव), अमर रमेश सदाकळे (वय-३४ रा. चिंतामणीनगर), निवृत्ती कृष्णा ऐवळे (वय – ६२ रा. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c4f1bccf-cd73-11e8-8c39-8ddcd12ee7c5′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवनगर परिसरातील रोहन ऑनलाइन लॉटरी या बंद दुकान गाळ्यात बेकायदेशीर ऑनलाइन जुगार व व्हिडीओ गेम चालत असल्याची माहिती पोलिस नाईक सुरज पाटील, सचिन फडतारे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रात्री उशीरा छापा टाकला. त्याठिकाणी विनापरवाना प्ले बुक नावाच्या अंकावर जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच रोहन लॉटरी सेंटर नावाचा कोणाताही शासकीय परवाना त्यांच्याकडे आढळून आला. सदर ठिकाणाहून जुगाराची साधने, संगणक व रोख रक्कम असा १ लाख ६६ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्याठिकाणी जुगार खेळण्यासाठी आलेल्या सात जणांवरही पोलिसांनी कारवाई केली. नऊ जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cc9722ab-cd73-11e8-ae5a-db9a5795a3c9′]

पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक वीरकर, उपनिरीक्षक गणेश शिंदे, सुरज पाटील, तेजस डांगे, सचिन सनदी, सचिन फडतारे, लक्ष्मण कौजलगी, श्रीपाद शिंदे, दत्ता तुरेवाले, हणमंत देवकर यांचा कारवाईत सहभाग होता.