क्राईम स्टोरी

प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी ‘त्यांनी’ केल्या चोऱ्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी कोण काय पाऊल उचलेल हे काही सांगता येत नाही. अशीच काही चकित करायला लावणारी घटना नाशिक येथून समोर आली आहे. प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी पैसे नसल्याने चोरीचा मार्ग स्विकारत दोन अल्पवयीन मुलांनी एक दोन नव्हे तर तब्बल 13 दुचाकी चोरल्याची घटना उघड झाली आहे. सध्या हा विषय नाशिक शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. हे अल्पवयीन मुलं चोरलेल्या दुचाकी विकायचे आणि त्यातून मिळालेल्या पैशातून ते प्रेयसीची हौसमौज पूर्ण करत होते.

लहानपणापासूनच मुलांवर टीव्हीचा आणि आजूबाजूच्या वातावरणाचा पगडा असल्याचे दिसत आहे. सध्याच्या तरुणांना आयुष्यात प्रेयसी हवीच आहे. मग वय आणि परिस्थिती कशी का असेना याचे त्यांना देणे घेणे नाही असे दिसत आहे. याचा अल्पवयीन मुलांवरही परिणाम होताना दिसत आहे. असाच काहीसा समज या चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांचा झालेला दिसत आहे. सदर दोन्ही मुलांची परिस्थिती बेताची आहे. दोघांनाही प्रेयसी आहे. परंतु त्यांच्याकडे प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी आणि स्वत:चा खर्च भागवण्यासाठी पैसा नव्हता. आता पैसा आणायचा कुठून असा प्रश्न त्यांना कायमच सतावत होता. यावर उपाय म्हणून त्यांनी चोरी करण्याचे ठरवले. यानंतर त्यांनी शहरातील दुचाकी चोरण्यास सुरुवात केली.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी चोरी करण्याचा सपाटा सुरूच ठेवला होता. अनेक दुचाकी त्यांनी चोरल्या. चोरलेल्या दुचाकी त्यांनी विकल्या आणि यातून बराच पैसाही मिळवला. दरम्यान त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यापैकी 13 दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. शिवाय इतर दुचाकींचा शोध पोलीस करत आहेत. पोलिसांनी सदर प्रेमवीरांना ताब्यात घेतले आहे. यानंतर त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button