गावठी कट्टयांसह दोघे जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा ३० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोहित छिंगे वाल्मिकी (१९, तळेगाव दाभाडे), अमोल वैजनाथ मिसाळ (२८, सेलु फाटा, ता. खेड जि. पुणे) अशी दोघांची नावे आहेत. दोघांवर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे युनीट चारचे पथक शहरात गस्त घालत असताना उत्तर प्रदेश येथील काही जण गावठी कट्टा बाळगत असून ते विक्री करण्यासाठी बाणेर परिसरात येणार आहेत अशी माहिती पथकातील पोलिस हवालदार गणेश साळुंके, पोलिस कॉन्स्टेबल रमेश राठोड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी बाणेर परिसरातील सदानंद हॉटेल जवळ सापळा रचला. त्यावेळी मोहित वाल्मिकी हा एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर शेखर नावाचा व्यक्ती त्यांना गावठी कट्टे विक्री करतो. त्याच्याकडून आणखी एक कट्टा घेतला आहे. तो चाकण य़ेथे आहे. असे सांगितले. पोलिसांनी तात्काळ चाकण येथे जाऊन अमोल मिसाळ याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र त्याच्याकडे अधिक सखोल तपास केल्यावर पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसे असा १५,५०० रुपये कितीचा मुद्दमाल जप्त केला.

ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, कर्मचारी रमेश राठोड, गणेश साळुंके, भालचंद्र बोरकर, रमेश साबळे, निलेश शिवतारे, अतुल मेगे, शंकर पाटील, सतिश वनवे, अनंत बोरावके, शितल शिंदे यांनी केली.