सराईताच्या हस्तकाच्या घरातून दोन पिस्तूले व काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सराईत गुन्हेगाराचा हस्तकाच्या घरातून सिंहगड रोड पोलिसांनी गावठी बनावटीचे दोन पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी सराईथ गुन्हेगार मंगेश कदम याचा हस्तक अभिषेक दुमणे याने घरात बेकायदा अग्निशस्त्रे लपवून ठेवली आहेत. अशी माहिती पोलीस हवालदार संतोष सावंत यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरातून २ गावठी पिस्तूले व ३ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्यावर याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने हत्यारे कोठून व कशासाठी आणली याचा तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आय़ुक्त रविंद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलीस आय़ुक्त बाजीराव मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संगीता यादव , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे, कर्मचारी संतोष सावंत, दयानंद तेलंगे पाटील, योगेश झेंडे, बालाजी जाधव यांच्या पथकाने केली.