पोलीस घडामोडी

चोरीची महागडी दुचाकी पुणे पोलिसांकडून जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड मधील तरुणाची एक लाख दहा हजार रुपये किंमतीची चोरीला गेलेली दुचाकी खडक पोलिसांनी जप्त केली आहे. खडक पोलिसांनी ही दुचाकी बागवान मस्जिद येथून जप्त केली आली. दुचाकी चोरीचा गुन्हा फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या आदेशानुसार पोलीस उप निरीक्षक मीना तडवी, पोलीस शिपाई महावीर दावने हे शुक्रवारी गस्त घालत होते. गस्त घालत असताना पथकाला बागवान मस्जिद येथे एक यामहा एफ.झेड (एमएच १५ डीवाय ३४६२) संशयास्पद आढळून आली. पथकाने या दुचाकीबाबत परिसरात चौकशी केली. मात्र, पोलिसांना दुचाकीबाबत कोणतीच माहिती मिळू न शकल्याने आरटीओ कार्य़ालयाकडून दुचाकीची माहिती घेतली. त्यावेळी दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार तुषार पांडुरंग पठारे (वय-२७ रा. पिंपरी चिंचवड) याने फरासखाना पोलीस ठाण्यात दिली असल्याची माहिती पथकाला मिळाली.

पोलिसांनी दुचाकी जप्त करुन पोलीस ठाण्यात आणून पठारे याच्याशी संपर्क साधला. पठारे याला पोलीस ठाण्यात आणून दुचाकी दाखवली असता त्याने दुचाकी आपलीच असल्याचे पोलिसांना सांगितले. खडक पोलिसांनी फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दुचाकी जप्त करुन ती फरासखाना पोलिसांच्या स्वाधीन केली आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या