राष्ट्रवादीकडून ऑफर; अद्याप विचार नाही, उज्वल निकमांचे सुचक वक्तव्य

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगावमधून विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु, उज्वल निकम यांनीच या चर्चेवर पडदा टाकल्याचे सध्या तरी दिसत आहे. मी राजकारणाबाबत सध्या कोणताही विचार केलेला नाही. राजकारणात प्रवेश करण्याआधी मला माझ्या कुटुंबाशी तसेच माझ्या जवळच्या लोकांशी चर्चा करावी लागेल, असे निकम यांनी म्हटले आहे. चोपडा येथे जिल्ह्यात दोन वर्षांत झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

राजकारणातील प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेविषयी उज्वल निकम म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने मला जळगाव लोकसभेसाठी तिकिटाची ऑफर दिली आहे. परंतु, माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. सध्या मी माझ्या खटल्याचा कामात व्यस्त असल्याने अजून या संदर्भात विचार केलेला नाही. राजकारणात प्रवेश करण्याआधी मला माझ्या कुटुंबाशी तसेच माझ्या जवळच्या लोकांशी चर्चा करावी लागेल, असे निकम म्हणाले.

चोपडा येथे जिल्ह्यात दोन वर्षांत झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य अरुणभाई गुजराथी आणि उज्ज्वल निकम हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्व आले होते. अरुणभाई गुजराथी यांच्यावर अ‍ॅड. निकम यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याने ते व्यासपीठावर काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते.

गुजराथी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई येथे बैठक घेण्यात आली होती. यावेळी जळगाव लोकसभेसाठी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांच्या नावावर सहमती दर्शविण्यात आली. मात्र, निकम यांच्या सहमतीनंतरच त्यांची उमेदवारी निश्चित करण्याचे ठरविण्यात येईल. पक्षातर्फे निकम यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चा करण्याचे अधिकार मला देण्यात आले आहेत. त्यांच्यासारखी हुशार व्यक्ती राजकारणात आल्यास जनतेला याचा फायदा होईल, असेही गुजराथी म्हणाले. रावेर मतदारसंघात तुमच्या नावाबद्दल चर्चा आहे, याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, दोन्ही पक्षाची आघाडी होणार आहे. परंतु जर दोन्ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्या तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांनी माझे नाव सुचवले तर नक्कीच मी निवडणूक लढवेल, असेही ते म्हणाले.