वारजे येथे नदीत अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वारजे येथील स्मशानभुमीजवळ नदीपात्रामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने तो मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम वारजे पोलिसांकडून सुरु आहे.

वारजे परिसरातील स्मशानभूमीजवळ नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. त्यांनी वारजे पोलिसांना याची माहिती दिली. वारजे पोलिसांनी घटनास्थली जाऊन याची पाहणी केली. त्यावेळी अग्निशमन दलाच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढून तो ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. मृत व्यक्तीच्या अंगावर शर्ट नव्हता. त्याचे वय २० ते २५ वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.