म्हणूनच ‘त्या’ नगरसेविकेने फोडल्या सभागृहात बांगड्या 

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्‍तांच्या अंगावर भाजपच्या नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी सभा सुरू असतानाच नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर बांगड्या फोडल्या आहेत. तसेच पालिका आयुक्तांच्या अंगावर बांगड्या फेकल्याने सभागृहात एकाच खळबळ उडाली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ठाकुर्ली नजीकच्या सर्वोदय हाईट्स या टोलेजंग इमारतीच्या बेकायदा बांधकामावर पालिकेच्या नगररचना विभागाने कारवाई केली नाही. या बेकायदा बांधकामावर काय कारवाई केली ? याबाबत पालिकेच्या नगररचना विभागाकडे माहिती मागवूनही माहितीची लपवा छापवी करण्यात आली आहे. तसेच याबाबत समाधानकारक माहिती देत नसल्याने  संतप्त झालेल्या चोळे प्रभागाच्या भाजपच्या नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी सभा सुरू असतानाच नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर बांगड्या फोडल्या आणि पालिका आयुक्तांच्या अंगावर बांगड्या फेकल्या आहेत.

या प्रकाराने पालिका आयुक्त संतप्त होऊन त्यांनी सभागृहातून काढता पाय घेत निघून गेले. पालिकेच्या नगररचना विभागाच्या भ्रष्ट, मनमानी, भोंगळ आणि मुजोर कारभाराच्या निषेधार्थ सभागृहातील नारी शक्ती एकवटल्याने सभा तहकूब करण्यात आली आहे.