मनोरंजन

उरी बाहुबली-२ वर भारी 

मुंबई : वृत्तसंस्था – उरी हा सिनेमा २०१९ मधील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. ‘उरी’ या चित्रपटाने नवीन रेकॉर्ड बनवले आहे. उरी’ च्या २३ व्या आणि २४ व्या दिवसाच्या कमाईने ‘बाहुबली २’ ला मागे टाकलं आहे.

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचा जोश बॉक्स ऑफीसवर कायम आहे. ‘उरी’ ने २३ व्या दिवशी ६.५३ कोटी रुपये कमावले तर ‘बाहुबली २’ ने प्रदर्शनाच्या २३ व्या दिवशी ६.३५ कोटी रुपये कमावले होते. तर २४ व्या दिवशी ‘उरी’ ने ८.७१ कोटी रुपयांचा आणि ‘बाहुबली २’ ने ७.८० कोटींचा गल्ला जमवला होता. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याविषयीची माहिती दिली आहे.

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक चित्रपट २०० कोटींच्या घरात पोहचला आहे. हा चित्रपट फक्त २८ कोटींच्या निर्मिती खर्चात तयार करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या ‘उरी’ येथे झालेल्या पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित हा ‘उरी’ चित्रपट आहे. यात विकी कौशल याने प्रमुख भूमिका केली आहे. विकीसह यात मोहीत रैना, परेश रावल, यामी गौतम आणि किर्ती कुल्हारी यांचीही प्रमुख भूमिका आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या