ताज्या बातम्या

SBI कडून व्हॅलेंटाइन्स डेला (Valentine day) ग्राहकांना अनोखं गिफ्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रत्येकाला वाटत असते, व्हॅलेंटाइन्स डेला आपल्या जोडीदाराने काहीतरी गिफ्ट द्यावं. म्हणून प्रत्येक जण या क्षणांची वाट पाहत असतात. तसेच तुम्ही यावेळी आपल्या जोडीदाराला एक संस्मरणीय गिफ्ट देऊ शकता. देशाची सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने ग्राहकांसाठी एक सुविधा काढली आहे.

त्यामध्ये तुम्ही आपल्या डेबिट कार्डावर आपला फोटो छापू शकतात. त्यासाठी बँकेनं SBI इन टच शाखा काढली आहे. या शाखेत खाते उघडल्यानंतर तुम्हाला अनेक सुविधांचा लाभ मिळणार आहे. तसेच बँकेची कामे लाइनमध्ये उभं न राहता झटपट होऊ शकतात. या शाखेत जाऊन तुम्ही मिनिटभरात आपलं खातं उघडू शकता. तुम्हाला डेबिट कार्डावर तुमचा फोटो फक्त 5 मिनिटात लावता येईल. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या ब्रँचमध्ये जावं लागेल. त्यासाठी तुम्हाला एडओन कार्डासाठी अप्लाय करावा लागेल. तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंड, बाॅयफ्रेंडला गिफ्ट द्यायचं असेल तर त्यांचं खातं उघडाव लागेल. ही सुविधा SBIच्या 143 शाखांमध्ये उपलब्ध आहे. ज्या कामांना महिनोमहिने लागायचे, ती कामं आता 15 मिनिटांत होतील.

SBIने इन एसबीआय इन टच शाखेत अगदी सहज सेव्हिंग्ज अकाऊंट, करंट अकऊंट, पीएफ अकाऊंट उघडता येतील. ‘AOK’ कियोस्क या खास फीचरद्वारे तुम्ही 15 मिनिटांत सर्व कामं करू शकता. डेबिट कार्डवर तुमचा फोटोही लावू शकता. 24 तासात पैसे आणि चेक जमा होतील. SBIच्या सर्व शाखेत एसबीआय इन टच ही सुविधा मिळेल.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button