‘पिंक’ चित्रपटाच्या तामिळ रिमेकमध्ये झळकणार बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री 

मुंबई : वृत्तसंस्था – दोन वर्षांपूर्वी अनिरूद्ध राय चौधरी दिग्दर्शिक ‘पिंक’ हा सोशल ड्रामा प्रचंड गाजला. अमिताभ बच्चन, तापसी पन्नू आणि किर्ती कुल्हारी स्टार या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली. बॉक्सऑफिसवरही चित्रपट हिट झाला. चित्रपटाचे हे यश पाहून आता साऊथमध्येही या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. या चित्रपटात विद्या बालनची वर्णी लागली आहे.

तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘पिंक’ चित्रपट २०१६ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचा तामिळ रिमेक बनणार असून यामध्ये विद्या बालन दिसणार आहे. विद्या बालन तापसी पन्नूच्या तर अजित हा अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

या वृत्ताला चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी दुजोरादेखील दिला आहे. येत्या जुलै महिन्यात चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. तर २०२० मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री विद्या बालनने नुकतंच ‘एनटीआर’ बायोपिकमधून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात विद्या एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका विद्या साकारताना दिसणार आहे. या बायोपिक पाठोपाठ विद्या आता तामिळ चित्रपटातही झळकणार आहे. त्यामुळे निश्चितच हा चित्रपट तिच्या चाहत्यांसाठीअधिक खास असणार आहे.