विखे-पाटलांना झटका ; विखेंच्या मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई:  वृत्तसंस्था – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांना आता जोरदार झटका बसला आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बहिणीचे पती आणि निवृत्त आयएएस अधिकारी संभाजी झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

त्यामुळे विखे-पाटलांना मोठा झटका बसला आहे. यापुर्वीही राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी आई-वडील काँग्रेसमध्ये असले म्हणून मी सुद्धा त्याच पक्षात राहावं असं नाही, असं म्हटलं होतं. त्यावर आता मेहुणाचा राष्ट्रवादीतील प्रवेश विखे-पाटलांना झटका देणारा आहे.

संभाजी झेंडे यांनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ते पक्षात कोणत्या पक्षात जातील हे माहित नव्हते. मात्र झेंडेंनी यांनी विखे-पाटलांच्या पक्षाची निवड न करता त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची निवड केली आहे. राष्ट्रावादी काँग्रेसचा सासवड इथे शेतकरी मेळाव्यात संभाजी झेंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राजकारणात प्रवेश करतील. त्यामुळे आता विखे-पाटलांच्या मेहुण्याचा हात काँग्रेसचा न दिसता त्यांच्या हातात राष्ट्रवादीचं घड्याळ पाहावयास मिळणार आहे.

राजकीय वर्तुळात सर्वांनाच शरद पवार आणि विखे कुटुंबाचे राजकीय संघर्ष माहित आहेत. त्यात विखेंच्याच मेहुण्यांनाच राष्ट्रवादीने गळाला लावल्याने दोघांचा हा संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.