…आणि वीरेंद्र सेहवाग भडकला 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – भारताचा पूर्व ओपनिंग बॅट्समन वीरेंद्र सेहवाग ज्याने आपल्या धुवांधार  बॅटिंगने अनेक  देशाच्या  बॉलरला पछाडून काढले. आणि अनेक रेकॉर्ड बनवलेअसा हा वीरेंद्र सेहवाग हा सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. वीरेंद्र सेहवागने नुकतेच ट्विट केले आहे  एका राजनैतिक संघटनेने  त्याच्या नावाचा उपयोग प्रचारासाठी केला आहे.
वीरेंद्र सेहवागनचे नाव ही राजनैतिक संघटना  खोट्या  प्रचारासाठी वापरात असल्याचे समोर आले आहे  .यात या राजनैतिक संघटनेने  एक जाहिरात दिले आहे ही  जहिरात अशी आहे की  सेहवाग च्या समर्थनासाठी एक विशाल किसान संमेलन आयोजित केले आहे. यामध्ये जास्तीत – जास्त लोक उपस्थित राहणार आहे.

वीरेंद्र सेहवाग ने ट्विट करत सांगितले 
वीरेंद सेहवाग ने आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत  या जाहिरातीचे खंडन करत म्हटले आहे की, मी आत्ता दुबईत असून या लोकांशी माझा कुठलाही संबंध नाही जेव्हा ही लोक स्वतः च्या आयोजित कार्यक्रमाला माझं नाव देऊन  लोकांना फसवत आहेत. जर  हे उद्या जिंकून आले तर लोकांना किती फसवतील अश्या फसव्या लोकांपासून सावधान  रहा
सध्या वीरेंद सेहवाग आपल्याला क्रिकेट कॉमेंट्री करताना दिसतो वीरूची ही  हिंदी कॉमेंट्री सगळ्यांना आवडते सेहवागने १०४ टेस्ट मध्ये  ४९. ३४ च्या रान रेट ने ८५८६रान बनवले ज्या मध्ये २३ शतक आणि  ३२ अर्धशतक आहे .त्याच बेस्ट स्कोर ३१९ आहे.