सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाची नगरपरिषदेला भेट

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन – वयाची 18 वर्ष  ओलांडल्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविणे अपेक्षित आहे, याबाबत मुला-मुलींना माहिती नसते. 18 वर्ष वयाच्या मुला-मुलींना ‘‘लोकशाही, निवडणुक व सुशासन’’ या विषयाची विशेष माहिती नसते. यासाठी प्रथम वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व मुला-मुलींना त्यांच्या जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांना भेटी देऊन निवडणुकीच्या कामकाजाविशयी माहिती देणे योग्य ठरेल. यानुसार ‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग’ व ‘विद्यार्थी विकास मंडळ’ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या परिपत्रकानुसार, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, तळेगाव दाभाडे, ‘विद्यार्थी विकास मंडळ’ यांच्या ह्याा उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील कला व वाणिज्य  शाखेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थीनींनी तळेगाव दाभाडे येथील स्थानिक नगरपरिषदेला नुकतीच भेट दिली.

पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी सुरेश कलमाडी ? 

नगरपरिषदेतील प्रशासकीय अधिकारी श्री. दिलीप गायकवाड यांनी विद्यार्थीनींना भारतातील निवडणूक आयोग, राज्यघटनेतील निवडणूकीच्या संदर्भात कलमे, निवडणुक प्रक्रिया तसेच नगरपरिषदेच्या कामकाजाची योजना यांची माहिती दिली. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. श्रीहरी मिसाळ, ‘विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. भागवत देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. योगिता शिंदे, नोडल अधिकारी प्रा. सतिष उडाण, प्रा. ज्ञानेष्वर साळवे, प्रा. सोमनाथ कसबे, नगरपरिषदेच्या प्रशासनातील मा. वाणी मॅडम इत्यादी उपस्थित होते.
यावेळी नगरपरिषदेला भेट देण्याचा उद्देश कार्यक्रमांच्या सुरुवातील प्रा. भागवत देशमुख यांनी सांगितला तसेच कार्यक्रमाविशयीची विद्यार्थीनींची प्रातिनिधिक प्रतिक्रिया सलमा शेख या विद्यार्थीनींना दिली. शेवटी प्रा. सोमनाथ कसबे यांनी नगरपरिषदेच्या प्रशासनाचे, प्राध्यपकाचे विद्यार्थीनींचे आभार मानले.