या दिवशी प्रदर्शित होणार नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिकचे पहिले पोस्टर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आता बॉलिवूडमध्ये बायोपिकचा जमाना आला असून भाग मिल्का भाग, मेरी कॉम पासून सुरु झालेला हा बायोपिकचा प्रवास, गुरु, दंगल, सुलतान, ‘पॅडमॅन’, ‘ठाकरे’, ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’  या बायोपिक पर्यंत येऊन थांबला आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक बायोपिक आले असताना आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक येणार असून या चित्रपटात मोदींचा रोल सिने अभिनेते विवेक ओबेरॉय साकारणार आहेत.

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिकच्या निर्मिती वरून राजकीय जगतात वाद निर्माण झाले असतानाच आता नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या बायोपिकची घोषणा मागच्या काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय हे नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहेत.  या सिनेमेचे पहिले पोस्टर ७ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात येणार असून १५ जानेवारी पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी या चित्रपटाचे नाव ‘पीएम नरेंद्र मोदी’ असेच सांगण्यात येत असून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हा चित्रपट प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे.

दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड याठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाणार आहे असे बोलले जाते आहे. त्याच प्रमाणे अभिनेते परेश रावल हे देखील मोदींची भूमिका साकारणार असल्याचे समजते मात्र या वृत्ताला अदयाप कसलीही पुष्टी देण्यात आली नसून नरेंद्र मोदी याच्या तरुण पणाची भूमिका विवेक ओबेरॉय आणि त्यांच्या आजच्या जीवनाची भूमिका परेश रावल साकारतील असा अंदाज चित्रपट जाणकारांनी लावला आहे. तर मोदी यांच्या बायोपिक बद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असून त्यांच्या बायोपिक मध्ये काय दाखवले जाणार आहे यासंदर्भात सर्वच क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत.  मोदींनी त्यांच्या आयुष्यात मोठा संघर्ष केला आहे त्यांनी वडनगर स्टेशनवर चहा विकला असून त्यांनी शालेय जीवना पासून संघाच्या शाखेत जाऊन संघाची साधना केली आहे. त्यांचा तेव्हा पासून पंतप्रधान होई पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. म्हणूच त्यांच्या जीवनाच्या संघर्षावर बायोपिक येऊ घातला आहे.