गणेशोत्सव काळात ‘त्या’ आवाजाला मोठी मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आरतीची वेळ झालेली आहे तरी कार्यकर्त्यांनी मंडळात उपस्थित राहावे ….गणेशोत्सव काळात असा आवाज ऐकायला आला नाही तरच नवल … गणेशोत्सव काळात आवाजाला जरा जास्तच मागणी असते. मग अगदी ते रोजच्या उद्घोषणांपासून ते अगदी देखाव्यांसाठी असलेल्या नाटकांमध्ये देखील आवाज म्हणजेच व्हॉईसओव्हर दिले जातात . गणेशोत्सव काळात या व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट खूप मागणी असते .

देखाव्यांमधील नाटकांमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट मुख्य भूमिका बजावतात. याबरोबरच नाटकाची संहिता तयार करणे , नाटक बसवणे, त्याला साजेसा व्हॉइस ओव्हर देणे अशी सर्व प्रक्रिया नाटकांमध्ये पार पाडली जाते. सध्या १५ ते २० मिनीटांसाठीच्या नाटकाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मोजक्या शब्दात प्रभावीपणे नाटकाद्वारे आपले मत सादर करणे याला खूप महत्व असते. यात महत्वाची भूमिका व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बजावतात .

रेडिओवाल्यांच्या आवाजाला जास्त मागणी

गणेशोत्सव काळात केल्या जाणाऱ्या नाटकांमध्ये रेडिओवर काम करणाऱ्या उद्घोषकांच्या आवाजाला जास्त मागणी असते . आकाशवाणी वरील उद्घोषक तसेच . F.M . रेडिओवरील आर .जे . देखील यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. नाटकाची संहिता किती वेळाची आहे यावरून व्हॉईस ओव्हर आर्टिस्टचे मानधन ठरवले जाते. गणेशोत्सवातील या काळात भारी मागणी केली जाते.

सध्याचा ट्रेंड प्रबोधनात्मक देखाव्यांचा

या विषयाबाबत ARK एन्टरटेनमेन्ट वर्क, पिंपळे गुरव चे व्यवस्थापक आशिष टिळक यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले , गणेशोत्सव काळात वर्षभर चालणाऱ्या कामांपेक्षा अधिक काम या काळात असते . काही लोक संहिता लिहण्यापासून ते पूर्ण नाटक तयार करण्यापर्यंत करणार करून घेतात तर काहीजण फक्त आवाजाचे रेकॉर्डिंग करून घेतात .पुण्यातील स्टुडिओज चे दर साधारण ताशी ५०० रुयापासून सुरु होतात . काही वेळेला हे दर संहितेवर तसेच व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट वर अवलंबून असते.

खास शैलीच्या आवाजाला मागणी

याबाबत प्रसिद्ध व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट दीपक रेघे यांनी आपली प्रतिक्रिया पोलिसनामाशी बोलताना दिली गणेशोत्सव काळात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट ना खूप मागणी असते. पुण्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे देखावे केले जातात. यात माहितीवजा देखावे,तांत्रिक देखावे ,जिवंत देखावे यांचा समावेश होतो .या सर्वांकरिता निवेदकांच्या आवाजाची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मी जवळपास १३ वर्षे गणेशोत्सवातील देखाव्यांकरिता आवाज देण्याचे काम केले आहे. यामध्ये मी दिलेल्या आवाजांपैकी शिवाजी महाराज ,संभाजी महाराज ,तसेच रावण यांसारख्या पात्रांना दिलेले आवाज खूप गाजले आहेत. गणेशोत्सव काळात या सर्व गोष्टींकरिता लाखोंची उलाढाल होत असते.

यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट

जाहिरात

जाहिरात

[amazon_link asins=’B018ZF76CG,B01C1Z3E90′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c649e24-b37d-11e8-98e1-cbae2890af4e’]