पुणे : ‘व्हॉल्व’ मध्ये गडबड झाल्याने लाखो लिटर पाणी वाया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धरणातील पाण्यावरून मनपा आणि जलसंपदा विभागात चांगले जुंपले असताना आता पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा रॉ-वॉटर व्हॉल्व खराब झाल्याने गुरुवारी सकाळी लाखो लिटर पाणी वाया गेले. सकाळी-सकाळी साडे सहा वाजता घडलेल्या या घटनेमुळे सुमारे २ तास हे पाणी वाहत होते. पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते की रस्त्यावर चार फूट पाणी साचले होते.

पुणेकरांना करवाढीचा दणका ! 

गुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याने सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वती पर्यंत येणाऱ्या सुमारे १६०० मी. मी. व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात येत असतानाच त्यामध्ये अचानकपणे बिघाड झाली. लाखो लिटर पाणी काही कळण्याच्या आताच रस्त्यावर वाया गेले आहे. पू. ल देशपांडे उद्यानाच्या समोर हे पाणी रस्त्यावर आले. या प्रकारामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ झाली.

अनेक वाहनचालकांना चांगलाच त्रास झाला. पाणी ८ ते १० घरामध्ये शिरले होते. एक भिंत फोडून पाण्याला वाट करून द्यावी लागली. आता रस्त्यावरील पाणी वाहून गेले असून वाहतूक सुरळीत असल्याचे नगरसेवक आनंद रिठे यांनी सांगितले. परिसरातील नागरिकांना या प्रकारामुळे त्रास सहन करावा लागला.