सांगली : वाहतूक पोलीस खुन प्रकरणात वापरलेले हत्यार जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

कुपवाड रस्त्यावरील हॉटेल रत्ना डिलक्समध्ये झालेल्या वाहतूक पोलीस समाधान मांट यांच्या खुनात वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच या गुन्ह्या वापरलेली बुलेट मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी आज (सोमवार) पुन्हा रत्ना हॉटेलची तपासणी केली.
मंगळवारी (दि. १७) कुपवाड रस्त्यावरील हॉटेल रत्ना डिलक्स येथे झाकीर जमादारसह त्याच्या दोन साथीदारांनी वाहतूक पोलिस समाधान मांटे यांचा सपासप वार करून खून केला होता. खून केल्यानंतर झाकीरचे दोन साथीदार राजू नदाफ आणि अन्सार पठाण चालत घटनास्थळावरून निघून गेले होते. तर झाकीर त्याची बुलेट (एमएच 14 ईजे 5656) घेऊन मिसाळवाडी (आष्टा) येथे मेहुण्याकडे गेला होता.
[amazon_link asins=’B07B4THQHM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’768d1ac1-8e8a-11e8-95ff-1701bb612ad6′]

दुसर्‍या दिवशी सकाळी मेहुणा वासीम शेख याला घेऊन मोटारसायकलवरून (एमए 10 बीएल 9761) दोघे इचलकरंजी आणि कोल्हापूर येथे गेले होते. या गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही गाड्या पोलिसांनी कोल्हापूर परिसरातून जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले हत्यार आरोपींनी हॉटेलजवळील गटारीत टाकून दिले होते. मांटे यांचा मृतदेह हॉटेल परिसरातून हलवून फूटपाथवर टाकल्याप्रकरणी हॉटेलचा मालक कुमार कुमसगे, व्यवस्थापक शब्बीर नदाफ यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपणार आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान सध्या तरी दारूच्या बिलावरूनच खून झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याआधारेच तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
[amazon_link asins=’B07D9MR4GJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7cf3e6af-8e8a-11e8-910f-0de06db597fa’]

फोनवरूनच मृतदेह हलवण्यास सांगितले…
हॉटेल रत्ना डिलक्सच्या आवारात मांटे यांचा खून झाल्याची माहिती व्यवस्थापक शब्बीर नदाफने कुमार कुमसगे यांना फोनवरून दिली होती. त्यानंतर कुमसगे याने त्याला फोनवरून मृतदेह हॉटेलच्या आवारातून हलवण्यास सांगितले होते. त्याच्या सांगण्यावरूनच मृतदेह हलवण्यात आला होता. त्यामुळे कुमसगेसह नदाफला पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात