आता तुम्हालाही घरबसल्या पाहता येणार ‘मतदान’ केंद्रांवरील हालचाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणूक प्रकियेवर काहीना काही वाद नेहमीच होत असतात. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या व्यवस्था आणल्या जात आहेत. ईव्हीएम मशिनवरील संंशय दूर करण्यासाठी व्हीव्हीपॅट प्रणाली सुरू केल्यानंतर निवडणूक आयोग राज्यातील संवेदनशील मतदार संघासाठी वेब कास्टिंग ही  सुविधा आणणार आहेत.  ज्यामुळे संवेदनशील मतदार संघातील मतदारांना निवडणूक केंद्रांवरील हालचाली घरबसल्या  पाहता येणार आहे.
सध्या काही निवडक मतदान केंद्रांवरच ही सुविधा असणार असल्याची माहिती निवडणूक अधिकार्‍यांनी दिली. निवडणूक अधिकार्‍याने मागणी केल्यास सर्वसामान्य मतदान केंद्रांवरही ही सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. २०१४  च्या निवडणुकांमध्येही काही ठिकाणी असे प्रयोग करण्यात आले होते. तेथे मतदानाचे प्रमाण वाढल्यामुळे यावेळी वेब कास्टिंगची संख्या वाढवण्यात येणार आहे.
अशी मिळेल घरबसल्या माहिती –
वेब कास्टिंगमुळे ही केंद्रे ऑनलाईन होणार आहेत. वेब कास्टिंगची लिंक आयोगाच्या वेबसाईटवर दिली जाणार असल्यामुळे प्रत्येक जण मतदान केंद्रावरील हालचालींवर नजर ठेवू शकणार आहे.
राज्यात सुमारे ६२६ अतिसंवेदनशील, तर २३३१ संवेदनशील निवडणूक केंद्रे आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील निवडणूक अधिकार्‍यांना हालचाली पाहण्यासाठी आतापर्यंत वेब कास्टिंग सुविधा होती. आता सामान्य मतदारांसाठीसुद्धा ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर सीसीटीव्हीचीही नजर ठेवण्यात येणार आहे.

श्रीनिवास पाटील अन्‌ विठोबा लांडेंच्या जेव्हा गप्पा रंगतात…!