दीपिका पेक्षाही जास्त रणवीर आहे ह्या स्त्रीचा फॅन..  

मुंबई :पोलिसनामा ऑनलाईन – ‘सिम्बा’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर सिंग आणि सारा अली खानसोबत अनेक रियालिटी शोमध्ये दिसून येत आहे, मात्र नुकताच रणवीर सींग स्टार प्लस वरील डान्स+४ या रियालिटी शोमध्ये गेला होता . मात्र तो शक्ती मोहन चा मोठा फॅन असल्याचे रणवीर ने  सांगितले आहे , रणवीरचे जगभरा  मध्ये मोठ्या संख्येने  फॅन असून मी शक्ती मोहन चा फॅन आहे असे तो म्हणतो .शक्ती मोहनने दीपिका पादुकोणसाठी ‘पद्मावत’ चित्रपटात नैनो वाले ने हे गीत कोरियोग्राफ केले होते , मात्र  सध्या शक्ती मोहन डान्स+४ च्या सेटवरील कॅप्टन आहे.
रणवीरची ऊर्जा आणि एक माणूस तसेच त्याच्या जबरदस्त ॲटिट्‌यूडमुळे ती खूपच प्रभावित झाली असून तो इतरांनाही प्रेरणा देतो. रणवीर त्याचे आयुष्य भरभरून जगतो असे शक्ती मोहन म्हणते . ती पुढे म्हणाली की, पद्मामावतमध्ये तिला दीपिकासाठी कोरियोग्राफी करण्याची संधी मिळाली.  त्यानंतर शक्तीने त्याला त्याच्या आणि दीपिकाच्या चार्टबस्टर गीत अंग लगा दे या गीतावर डान्स करण्याची विनंती केली.
रणवीर म्हणाला, “मला एक कलाकार म्हणून शक्ती नेहमीच आवडली असून मी राऊडी राठोडमध्ये तिला आ रे प्रितम प्यारे वर डान्स करताना पाहिले तेव्हा तिचा परफॉर्मन्स पाहून थक्क झालो होतो आणि तिच्याबद्दल चौकशीही केली होती. मी शक्तीचा त्या गाण्यापासून मोठा चाहता असून आज तिच्यासोबत ह्या मंचावर नाचणे मी माझा सन्मान समजतो.” त्यानंतर रणवीरने आ रे प्रितम प्यारे ह्याच गीताची विनंती केली आणि तो तिच्यासोबत चित्रपटातील स्टेप्ससह नाचला.सिनेमांबाबत बोलायचे झाले तर ‘सिम्बा’मध्ये त्याच्यासोबत सारा अली खान दिसणार असून, हा सिनेमा साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ‘सिम्बा’हा चित्रपट येत्या २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला सेनेमागृहात येत आहे.