विठूरायाच्या ‘त्या’ दर्शनासाठी आता मोजावी लागणार एवढी किंमत 

पंढरपूर : पोलिसनामा ऑनलाईन – पंढरपूरच्या विठूरायाचे ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. विठूरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी आता 100 रुपये मोजावे लागणार आहेत. मंदिर समितीच्या बैठकी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत केले जात असून आता घुसखोरी करून दर्शन घेणाऱ्या करणाऱ्या VIP साठीही पैसे देऊन दर्शन देण्याची मागणी करण्यात अली आहे.

विठूरायाच्या ऑनलाईन दर्शनाला 100 रुपये आकारण्याचा निर्णय मंदिर समितीने आजच्या बैठकीत घेतला आहे. देशभरातून येणारे बहुतांश उच्च व मध्यमवर्गीय भाविक विठूरायाच्या दर्शनाला येण्यापूर्वी ऑनलाईन बुकिंग करुन पंढरपूरमध्ये येत असतात. त्यामुळे या भाविकांना मोफत व लवकरात लवकर दर्शनाचा लाभ मिळतो. काही लोक गैरप्रकार करुन पैसे मिळवत होते आता या निर्णयामुळे याला देखील आळा बसणार आहे.

वर्षभरातील काही गर्दीचे दिवस वगळता 330 दिवस रोज सरासरी दोन ते ३००० हजार भाविक हे ऑनलाईन दर्शन घेत असतात.  मंदिराच्या आजच्या निर्णयामुळे यापुढे ऑनलाईन दर्शनासाठी 100 रुपये द्यावे लागणार आहेत. यामुळे मंदिराच्या उत्पन्नात वर्षाला 8 ते 10 कोटी रुपयाची वाढ होणार असून. या निर्णयामुळे सर्वसामान्य भाविकांना कोणताही त्रास होणार नसल्याने भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.