जरा हटके

‘व्‍हॉट्‍सॲप’ आहे की लग्नपत्रिका ? एकदा बघाच !

सुरत : वृत्तसंस्था – सध्या अनेक चित्र विचित्र किंवा वेगवेगळ्या थीम असणाऱ्या लग्नपत्रिका पाहायला मिळत आहे. आपली लग्नपत्रिका लक्षवेधक होण्यासाठी कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वीच एका केमिस्ट्रीच्या शिक्षकांची केमिस्ट्रीच्या थीम आधारीत लग्नपत्रिका सोशलवर चांगलीच व्हायरल झाली होती. विशेष म्हणजे या लग्नपत्रिकेची दखल चक्क शशी थरूर यांनीही घेतली होती. आता अशीच एक हटके लग्नपत्रिका समोर आली आहे. जी आतापर्यंत कोणीच बनवली नसेल. गुजरातमधील एका जोडप्‍याने व्‍हॉट्‍सॲप लग्‍नपत्रिका बनवली आहे. आश्‍चर्य वाटतय ना पण ही व्‍हॉट्‍सॲप डिझाईनची लग्‍नपत्रिका पाहिताना तुमची काहीशी गफलत होईल. खरं खुरं व्‍हॉट्‍सॲप हातात धरून मेसेज वाचल्याचा फील तुम्हाला येईल.
Image 2

प्रत्‍येक जोडीप्रमाणेच सुरतमधील आरजू आणि चेतन देसाईला त्‍यांच्‍या लग्‍नाची लग्‍नपत्रिका काही हटके म्‍हणजे नाविन्‍यपूर्ण बनवायची होती. चेतन हा वेब डिझाईनर आहे. त्‍यालाच व्‍हॉट्‍सॲप  डिजायनची लग्‍नपत्रिका  बनविण्‍याची कल्‍पना सुचली. व त्‍यांने चार पानाची व्‍हॉट्‍सॲप  डिझाईन असलेली लग्‍नपत्रिका तयार केली. या चार पानाच्‍या लग्‍नपत्रिकेचे कव्‍हर पेज हे व्‍हॉट्‍सॲपचे आहे.
Image 3

याची माहिती देताना आरजू म्‍हणाली, “चेतनला ही लग्‍नपत्रिका तयार करण्‍यास एक आठवडा लागला. लग्‍नपत्रिका तयार झालेली मी पाहिली तेव्‍हा ती खूपच सुंदर झाली होती. या पत्रिकेत व्‍हॉट्‍सॲपचा लोगो वापरण्‍यात आला आहे. तसेच या पत्रिकेला पारंपरिक लुक येण्‍यासाठी लाडक्‍या गणपती बप्‍पाचा फोटो देखील वापरला आहे.”
Image 4

ही लग्‍नपत्रिका पाहताना व्‍हाट्‍सॲपच पाहतोय की काय, अशी काही वेळ गफलत होते. तुम्‍हाला हटके लग्‍नपत्रिका बनवायची असल्‍यास अशापद्धतीची लग्‍नपत्रिका बनवायचा विचार करु शकता. जेणेकरून तुमचीही लग्नपत्रिका काही वेगळी आणि हटके असेलच शिवाय लक्षवेधकसुद्धा होईल.
Image 5
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या