व्हॉट्सअॅपचे कार्यालय भारतातच पाहिजे; केंद्राची स्पष्ट भूमिका

मुंबई  : वृत्तसंस्था
व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला तंबी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आज व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी  केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. भेटी दरम्यान प्रसाद यांनी व्हॉट्सअॅपच्या सीईओंना तीन सूचना केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्हॉट्सअॅपचे कार्यालय भारतातच पाहिजे असे सांगण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B01MUUPL3Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d952e32f-a54e-11e8-810f-e5cdfb7768ff’]

भारतात व्हॉट्स अॅपचे कॉर्पोरेट कार्यालय सुरु करावे, भारतात तक्रार निवारणासाठी अधिकारी नेमावेत तसेच भारतीय कायद्याचे पालन करावे या तीन मुख्य सूचना भारत सरकारने केल्या आहेत. सद्य स्थितीत व्हॉट्स अॅपशी संपर्क साधायचा असल्यास अमेरिकेत बोलावं लागतं हे आम्हाला अमान्य असून ही यंत्रणा भारतातच असायला हवी असे प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
[amazon_link asins=’B019MQLUZG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dffa8728-a54e-11e8-bb39-e90b9906f845′]

व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला तंबी दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. या अफवांमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले असून या अफवांवर ठोस नियंत्रण मिळवणं गरजेचे असल्याचे सरकारनं स्पष्ट केलं आहे. या भेटीनंतर रविशंकर प्रसाद यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमच्यात तीन विषयांवर चर्चा झाली आणि व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारच्या सूचनांची पूर्तता करण्याची तयारी दर्शवली, असे त्यांनी सांगितले.