महत्वाच्या बातम्या

सावधान ! तुमच्या व्हॉट्सॲपला हॅकर्सपासून धोका 

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – सोशल नेट्वर्किंग साईट्सपैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सॲप. जगभरात १५० कोटी व्हॉट्सअप युजर्स आहेत. व्हॉट्सॲप एवढे लोकप्रिय आणि उपयोगी असले तरीही त्यामध्ये कोणतेही सिक्युरिटी फिचर यामध्ये उपलब्ध नाही त्यामुळे युझरचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होण्याचा धोका आहे.

एका रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सॲप हॅकर्सच्या निशाण्यावर आहे. युझर्सला फसवण्यासाठी हॅकर्सनी एक नवीन योजना तयार केली आहे. याचे नाव Kidnap scam असून याच्या माध्यमातून हॅकर्स युझर्सकडून पैसे लुटतात.

असे करण्यात येते अकाउंट हॅक
हॅकर्स युझरचे डुप्लीकेट अकाऊंट तयार करुन त्यांच्या सर्व्हिस प्रोवायडरला कॉल करतात. कॉल करुन ते सीम हरवल्याचे सांगून त्यांना दुसरे सीम देतात. असे केल्यानंतर हॅकर्स OTP चा वापर करुन युझरचे व्हॉट्सॲप अकाउंट ओपन करतात. त्यानंतर अकाउंट हॅक करतात.

हॅकर्स व्हॉट्सॲप वापरकर्त्याच्या सर्व कॉन्टॅक्टसला मॅसेज पाठवून सांगतात की युझरला किडनॅप करण्यात आले असून त्या बदल्यात रक्कम द्या. सिंगापूरमध्ये अशा प्रकारच्या Kidnap scam ला बळी पडलेल्या १० लोकांनी तक्रार दाखल केली आहे.

सोशल मीडियाचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. सोशल मीडियाचा वापर करणे दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललं आहे. हॅकर्सच्या अशा हल्ल्यापासूनबचाव करण्यासाठी सध्या तरी कोणते तंत्रज्ञान, एंटी हॅक फिचर किंवा अपडेट उपलब्ध नाही. मात्र हॅकर्सपासून वाचण्यासाठी तुम्ही योग्य ती काळजी घेऊ शकता. Kidnap scam चे शा प्रकारचे मेसेज आपल्या नातेवाईकाकडून किंवा मित्राकडून आल्यास त्या नातेवाईकाला त्याविषयी माहिती देण्याची जागरूकता दाखवावी.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या