महाराष्ट्रात इंधनदर दरवाढीबाबत तोडगा निघणार ? 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाकीनऊ आले आहे असे असताना किमान महाराष्ट्रातील जनतेला तरी दरवाढीपासून दिलासा मिळेल अशी आशा आहे. कारण असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी मुंबई येथे दिले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’05c0185d-c21f-11e8-a750-056ff0b8c8da’]

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांना होणाऱ्या त्रासाची सरकारला जाणीव असून, इंधनाला जीएसटीमध्ये आणण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. येत्या २८ तारखेला जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व राज्‍ये सहभागी होणार असून, त्यात यावर निर्णय अपेक्षित आहे. तथापि, या बैठकीत मतैक्‍य न झाल्‍यास महाराष्‍ट्र सरकार सर्वसामान्यांना इंधनदर दिलासा देण्यासाठी योग्‍य ती पावले उचलेल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणणार ?

पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केल्याबाबत विचारले असता मुनगंटीवार म्‍हणाले की, ‘इंधनदरांबाबत या आधीच्या यूपीए सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आंतरराष्‍ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढले की आपल्‍या देशात इंधनदरांत आपोआप वाढ होते. सरकार त्‍यात काही करू शकत नाही. मात्र जीएसटी परिषदेची उद्या, शुक्रवारी बैठक होणार आहे. या बैठकीत पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार होणार आहे.’

गुगल भाऊ … हॅपी  बर्थडे… !

इंधन दरवाढीच्या विरोधात ‘भारत बंद’मध्ये एक भूमिका घ्‍यायची आणि जीएसटी परिषदेत दुसरीच भूमिका मांडायची हे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचे धोरण असून त्यांनी ते सोडावे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यात लहानमोठ्या धरणातील पाणीसाठा खालावला आहे. मराठवाड्यात ज्या भागात टंचाईसदृश परिस्थिती अथवा दुष्‍काळाचे सावट असेल त्या भागात सरकार पूर्ण शक्‍तीनिशी तेथील नागरिकांच्या पाठीशी उभे राहिल. राज्‍याच्या तिजोरीवर पहिला हक्‍क हा शेतकऱ्यांचा आहे, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

[amazon_link asins=’B073QVG2GL,B00LHRORMC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e5568f29-c21f-11e8-bc04-ffc13aa7a089′]