शकीराचा ‘टेन इयर चॅलेंज’ व्हिडीओ, थिरकत आहे मराठी गाण्यावर 

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत सगळ्यांना ‘टेन इयर चॅलेंज’ वेड लागलं आहे. त्यात वर्ल्ड फेमस गायिका शकिरा कशी माग राहील ?  तिचाही टेन इयर चॅलेंजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही वर्षांपूर्वी वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेतील शकीरा ‘वाका वाका’ या गाण्याचा फिवर साऱ्या जगाला चढला होता. आता याच गाण्याचं टेन इयर चॅलेंज म्हणून  शकिरा चक्क मराठी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. ‘वाका वाका’ ऐवजी ती आता मराठमोळं ‘वाटा…वाटा गं’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, ‘वाटा वाटा’ गाण्याची गायिका प्रियांका बर्वे हिनं हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ‘शकीरा मी गायलेल्या गाण्यावर डान्स करतेय हे माझं भाग्य आहे’ असंही प्रियांकानं लिहिलं आहे.

शकिराचा हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. ‘टेन इयर चॅलेंज’चा हॅशटॅगही व्हिडिओला देण्यात आला आहे. ‘वाका वाका’ ते ‘वाटा वाटा’…शकीराचं ‘टेन इयर चॅलेंज’ असं म्हणत हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय.

समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाच्या गाण्यांची सध्या सोशल मिडीयावर तुफान चर्चा आहे. या चित्रपटातील ‘वाटा वाटा वाटा गं’ हे प्रियांका बर्वेने गायलेलं आहे. तीच हे गं प्रेक्षकांनाही भावलं आहे.