क्राईम स्टोरी

१० हजाराची लाच घेताना महावितरणचा अभियंता ACB च्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोल शिफ्टींग व मिटर बसविलेल्या कामाचा मोबादला म्हणून ठेकेदाराकडून दहा हजारांची लाच स्विकारताना नसरापुर येथील महावितरणच्या सहायक अभियंत्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

सचिन रघुनाथ पवार (३७, मांजरी) असे अभियंत्याचे नाव आहे.

तक्रारदार हे ठेकेदार आहेत. त्यांना पोल शिफ्टींग व मिटर बसविलेल्या कामाचा मोबदला म्हणून महावितरणच्या नसरापूर शाखेचे सहायक अभियंता सचिन पवार यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रादाराने यासंदर्भात तक्रार केल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याची पडताळणी केली. त्यात त्याने दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी नसरापूर येथील महावितरणच्या कार्यालयात सचिन पवार याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.

अशा प्रकारे कोणी लाच मागिलतल्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button