तुम्ही कोणते हेल्मेट घेताय ? नक्की पहा कारण प्रश्न तुमच्या जीवाचा आहे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन : (प्रेरणा परब खोत ) – पुण्यात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट घालने सक्तीचे केले आहे. ज्या वाहन चालकाने हेल्मेट घातले नाही त्यांना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. पण पुण्यातील काही संस्था काही राजकीय पक्ष आणि काही नागरिक  यांचा हेल्मेटसक्तीला विरोध आहे. असे असले तरी पुण्यातील रस्त्यांवरून जाताना तुम्हाला चौका  चौकात हेल्मेट नसलेल्या व्यक्तींवर कारवाई होताना दिसेल.यापूर्वी सक्ती नव्हती तेव्हा लोक हेल्मेट वापरत नव्हते पण आता दंडाच्या कारवाईने नागरिकांनी हेल्मेट घालायला सुरुवात केली आहे. शेवटी हेल्मेट हे तुमच्या सुरक्षेसाठी आहे हे मात्र निश्चित.
रस्त्यावरील फळविक्रेत्यांची जागा घेतली हेल्मेट विक्रेत्यांनी 
पुण्यात हेल्मेट सक्ती केल्यानंतर  ठिकठिकाणी हेल्मेट विक्री होताना दिसत आहे. यापूर्वी जिथे विशेषतः हायवेवर फळविक्रेते दिसत होते ,त्यांची जागा आता हेल्मेट विक्रेत्यांनी घेतली आहे. पुण्यातील हडपसर -स्ववारगेट , डेक्कन रोडवरील नदीकाठचा परिसर , नाशिक फाटा , शिवाजीनगर हिंजवडी हायवे तसेच शहरातील मुख्य ठिकाणी किरकोळ हेल्मेट विक्रेते दृष्टीस पडतायत. पण तुम्ही जे हेल्मेट घेत आहात ते कोणत्या दर्जाचे आहे ? हे नक्की तपासून पहा ते हेल्मेट  ISo मानांकित आहे का याची खात्री नक्की करून घ्या कारण प्रश्न तुमच्या जीवाचा आहे.
मानांकन नसलेले हेल्मेट विकल्यास होणार कारवाई 
रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार १५ जानेवारी २०१९ पासून केवळ आयएसआय प्रमाणित हेल्मेटच विकली जाऊ शकतात. जर हेल्मेट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी याचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. जर कोणी दोषी आढळले, तर त्याला दोन वर्षे तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. हेल्मेटची विक्री करणारे आणि त्याचे साठवणूक करणाऱ्यांनाही हे नियम लागू करण्यात आले आहेत.
वॉरंटशिवायही केली जाऊ शकते अटक 
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणत्याही व्यक्तीला अटक वॉरंटशिवायही अटक केली जाऊ शकते. आयएसआय प्रमाणित नसलेली हेल्मेट दुचाकीस्वारांच्या कोणत्याही कामाची नाहीत. त्यामुळे त्याची निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, असे हेल्मेट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या संघटनेनेही म्हटले आहे.
गुणवत्ता निकष काय? 
–१५ जानेवारीनंतर केवळ आयएसआय प्रमाणित हेल्मेटच विकले जाऊ शकतात.
–हे हेल्मेट ब्युरो ऑफ इंडियन स्टॅडर्ड्सच्या IS 4151:2015 मानकांवर आधारित असले पाहिजेत.
–हेल्मेटचे वजन १.२ किलोग्रॅमपेक्षा जास्त असू नये.
–आयएसआय प्रमाणित नसलेले हेल्मेट विकणे आणि साठवणूक करणे बेकायदा.
–दुचाकी चालवताना औद्योगिक वापरासाठीचे हेल्मेट वापरणाऱ्यांवर होणार कारवाई.
हेल्मेटची निवड कशी कराल ?
१) तूमच्या डोक्याला बसणारे हेल्मेट निवडा. हेल्मेट  निवड करतांना डोक्याला एकदम फिट्ट बसणारे नको अन त्यातून तूमचे डोके त्याच्या आत फिरेल इतकेही ढिले नको.
२) हेल्मेटच्या बाह्यस्वरूपावर जरा लक्ष देणे गरजेचे आहे. उगाच मित्राकडे आहे म्हणून तसेच, भास मारण्यासाठी घेतलेले, स्वस्त, रस्त्यावरचे नको.
३) हेल्मेटवर  रंगीत रेडीयम असते. बर्‍याचदा रेडीयम विनाईल प्रकारातले असते. ते तसे नसावे. विनाईल कालांतराने फिके पडते. रेडीयम असेल तर रात्रीच्या वेळी प्रकाशमान होवून इतर वाहनांना ते दिसू शकते हा फायदा रेडीयममुळे मिळतो. बर्‍याच हे वर केवळ रंग लावलेले आकार असतात त्यांचा उपयोग तसा नसतो. केवळ हे आकर्षक दिसते व किंमत वाढते.
४) हेल्मेट  कोणत्या प्रकारात घ्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निवडीचा प्रश्न असतो. शारिरीक गरज, खिशाचा सल्ला, चेहेर्‍याचा, डोक्याचा आकार आदी बरेच मुद्दे त्यात येवू शकतात. हे घेणे म्हणजे साडी घेण्यासारखे आहे.
५) आपण ढोबळमानाने ‘खुले’ व ‘बंद’ प्रकाराचे हेल्मेट (Open and Closed Type of Helmets) असतात असे मानू. खुले म्हणजे केवळ कवटीचे संरक्षण करणारे व बंद म्हणजे कवटी अधिक जबड्याचे (चेहर्‍याचे) संरक्षण करणारे हेल्मेट होय. खुल्या हेल्मेटच्या प्रकारात तुम्ही खर्च केलेल्या पैशांमधून केवळ कवटीचे संरक्षण होते. त्या पैशात थोडी जास्त भर टाकून बंद प्रकारचे हेल्मेट खरेदी करता येवू शकते. पण काही जणांना बंद प्रकारच्या हे मध्ये कोंडल्यासारखे भासू शकते. (हो भासच.) कानांवर इतर वाहनांचे आवाज कमी येवू शकतात. त्यामुळे ज्याच्यात्याच्या प्रकृतीनुसार हे घ्यावे.
७) हेल्मेट निवडतांनातली एक महत्वपुर्ण पायरी:
हेल्मेटचे पुढील फोम किंवा कड तुमच्या भुवईच्या वरतीपर्यंत येवू द्या असेच हेल्मेट निवडा व त्या पद्धतीतच पुढे वापरत चला. पुढेपुढे आतील थर्मोकोलचा आकार तसा घडेल. ही एक जास्तीच्या संरक्षणासाठीची तरतूद आहे.
८) हेल्मेट घातल्यानंतर त्याचे पट्टे काळजीपुर्वक बांधा/ लावा. त्याच्या लॉकचा “टक्क” असा आवाज आल्याची खात्री करा. पट्टे न बांधता घातलेले हेल्मेट हे ‘असुरक्षित xन संबंधा’सारखे आहे हे लक्षात घ्या.
९) कालांतराने हे पट्टे ढिले होतात. ते वेळोवेळी हनूवटीला घट्ट होतील असे करत चला.
८) हेल्मेटची काच जास्त वापरामुळे चरे पडलेली असेल, त्यातील गिअरमधून पडत असेल तर बदलवून घ्या.
९) काळ्या रंगाची काच कधीही लावू नका. फारच उन दिसत असेल तर हेल्मेटमध्ये गॉगल वापरा.
१०) एकच हेल्मेट हे आयुष्यभरासाठीचे नाही. दोन-पाच वर्षात, ऐपतीप्रमाणे बदलणे गरजेचे आहे.
हेल्मेट न वापरणार्‍यांसाठी: 
एकदा तुम्ही हेम्लेट गाडी चालवतांना सतत आठ दिवस वापरा. नवव्या दिवशी
हेल्मेट न घालता गाडी चालवणे तुम्हाला आवडणार नाही हे नक्की.
मुख्य म्हणजे रस्त्यावरचे नियम पाळा.
हॅप्पी ड्रायव्हींग.