कोण अमित शहा ? दिवाकर रावते यांचा सवाल

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच राज्यात येवून केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता ना. दिवाकर रावते म्हणाले, कोण अमित शहा ? असा प्रतिप्रश्न करून त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली.

कराड येथील बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आल्यानंतर ना. दिवाकर रावते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी शिवसेना-भाजपा युतीबाबत छेडून भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी युती झाली तर त्यांना बरोबर घेवून निवडणूक लढवू. नाही झाली तर राज्यातील ४८ पैकी ४0 जागा जिंकू, असे म्हटल्याचे निदर्शनास आणून दिले असता ना. रावते म्हणाले, अमित शहा, कोण अमित शहा? यावर पत्रकारांनी अहो ते भाजपाचे अध्यक्ष असे म्हणताच भाजपाला अध्यक्ष आहे ? त्यांनी आमच्या शिवसेनेचे नाव घेतले आहे का? असा प्रतिसवाल करत या प्रश्नाला त्यांनी सोयीस्कर बगल दिली.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसह विद्यार्थींनींना एस.टी. महामंडळाने मोफत मासिक पास योजना सुरू केली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या बसेसमधून वाहक विद्यार्थ्यांना गाडीत प्रवेश देत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली असता ना. रावते म्हणाले, महामार्गावरून लांबपल्ल्याच्या बसेस धावत असल्याने दूरच्या प्रवाशांना प्रवास करता यावा. विद्यार्थ्यांनी शक्यतो लोकल गाड्यातून प्रवास केला पाहिजे, असे सांगून वाहक घेत असलेल्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले.