कोण आहे हॅकर सईद शूजा ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगबद्दल सर्व माहिती असल्यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप हॅकरने केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आता हा सईद शूजा नक्की कोण आहे ? सईद शूजा याने केलेले काही महत्त्वाचे खुलासे याविषयीची माहिती पॉलिटिकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस  ब्युरो (प्राब) पुणे ने प्रसिद्ध  केली आहे.


* सईद शूजा कोण आहे?

>  सय्यद शुजा हा 2009 ते 2014 दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये कार्यरत होता.

>   निवडणूक आयोग तसेच राजकीय पक्षांनाही लंडनमध्ये आयोजित एका हॅकेथॉनमध्ये बोलावण्यात आले होते.
>   विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्या व्यतिरिक्त लंडनमध्ये कोणीही उपस्थित नव्हते.
>  दरम्यान, सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर चार दिवसांपूर्वी हल्ले झाले होते, त्यामुळे तो गुप्त ठिकाणावरून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात आहे.
>  ईव्हीएम डिझाईन केलेल्या टीममध्ये आपण होतो, असा दावा शुजा याने केला आहे.
>   ईव्हीएम मशीन हॅक कशी करता येते, हे आपण दाखवू शकतो, असे शुजाने म्हटले आहे.
>   भारतातील ईव्हीएम बनविणारी Electronics Corporation of India Limited (ECIL)चा कर्मचारी होता.
>  मूळचा हैदराबाद येथील रहिवाशी. 2014 पासून अमेरिकेत राजकीय आश्रय घेतला आहे.
>  सायबर एक्स्पर्ट सईद शूजा असे या एक्स्पर्टचे नाव आहे.
>  सायबर तज्ज्ञ सय्यद शुजा याने लंडनमधून स्काईपद्वारे हा संवाद साधला होता.
>  या व्हीडीओमध्ये त्याने फेस मास्क परिधान केले होते.

>  शुजाच्या काही सहकाऱ्यांचा खून झाला. त्यामुळे त्याला भारतात असुरक्षित वाटायला लागले. या कारणाने २०१४ साली त्याने भारत सोडला.

* सईद शूजा याने केलेले काही महत्त्वाचे खुलासे 
>  इंडियन जर्नॅलिस्ट असोसिएशन ऑफ युरोप आणि फॉरेन प्रेस असोसिएशन लंडन यांनी ही परिषद आयोजित केली होती यामध्ये ईव्हीएम हॅकिंगबाबत दावा.

>  काही दिवसांपूर्वी आपल्यावर भाडोत्री व्यक्तींनी हल्ला केला होता.
>  ECIL याकंपनीने 2014च्या निवडणुकीसाठी EVMs बनवले होते.
>  2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होते, त्यामुळेच त्यांची हत्या झाली.
>  लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केले होते. 14 लोकांच्या टीमने हे काम केले होते. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा.
>  ईव्हीएम हॅक करण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशनने भाजपला ‘लो फ्रेक्विनसी सिंग्नल’ मिळवून दिले माझ्या सदस्यालाही मारले – मृत्यू प्रकरणाला जातीय रंग देण्यात आला.
>  आमच्या तज्ज्ञांनी भाजपचा डाव हाणून पाडला नसता तर राजस्थान, छतीसगड, मध्यप्रदेश भाजपचा विजय झाला असता.
>  दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या सांगण्यावरुन हॅक केले असल्याचाही दावा.
>  ईव्हीएममध्ये घोटाळा होऊ शकतो, असे आम आदमी पक्षाला माहीत होते.
>  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ईव्हीएममध्ये घोटाळा करण्यात आला होता. या निवडणुका पारदर्शक नव्हत्या. त्यामुळे काँग्रेसचा २०१ जागांवर पराभव झाला होता.
>  डेटा ट्रान्समीट करण्याचे नेटवर्क रिलायन्सकडे आहे. त्याचा भाजपला फायदा झाला.
>  ईव्हीएम हॅक करण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशनने भाजपला ‘लो फ्रेक्विनसी सिंग्नल’ मिळवून दिले.
>  ईव्हीएममध्ये घोटाळा झाला याची जाणीव इतर कर्मचाऱ्यांना नव्हती. डेटा एन्ट्री करत असल्याचे त्यांना वाटत होते.
>  गौरी लंकेश या ज्येष्ठ महिला पत्रकाराला ईव्हीएम घोटाळ्याबद्दल माहिती होती. त्यांनी या घोटाळ्याची माहिती प्रकाशीत करण्याची तयारीही दर्शविली होती. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.
>  रिलायन्स जियो या कंपनीने भारतीय जनता पक्षाला ईव्हीएम हॅक करण्यासाठी मदत केली. यासाठी त्यांनी कमी वारंवारतेचे तरंग (फ्रिक्वेन्सी) पुरवले असा खळबळजनक दावा शुजाने केला आहे. पण, त्याच्या या दाव्याची पुष्टी करेल असा कोणताही पुरावा त्याने दिला नाही.
>  भारतीय जनता पक्षासोबतच समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस देखील ईव्हीएम हॅक करण्याच्या कारस्थानात गुंतल्याचे त्याने म्हटले आहे.
>  ब्ल्यूटूथने ईव्हीएम हॅक करता येत नाही.
>  ग्रॅफाइटवर आधारित ट्रान्समिटरने हॅकिंग शक्य असते. या ट्रान्समिटरच्या मदतीने २०१४ मध्ये घोटाळे करण्यात आले.
>  भाजपने मिलिट्री ग्रेडफ्रिक्वेन्सी ट्रान्समिट मॉड्यूलर वापरले
>  भाजपने कमी फ्रिक्वेन्सीच्या मशीनच्या चाचणीचा प्रयत्न केला.
>  ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपानंतर भाजपने तज्ज्ञांनाही हॅक करता न येणाऱ्या ईव्हीएमचा वापर केला होता.

>  रिलायन्स जिओने लो फ्रिक्वेसी सिग्नल हॅकसाठी मदत केली. जिओकडे डाटा ट्रान्समिट करण्यासाठी नेटवर्क आहे. त्याचाच लाभ भाजपने घेतला.

* माझ्या सहकाऱ्याला देखील मारले मारले – सईद शूजा
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी माझ्या कर्मचाऱ्याला या घोटाळ्याबाबत एप्रिल २०१४ मध्ये माहिती समजली होती. हैदराबाद येथे भाजपच्या नेत्याबरोबर मी आणि माझ्या सहकाऱ्याची बैठक होती. यावेळी आमच्यावर गोळीबार झाला. त्यात मी थोडक्यात बचावलो तर माझ्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाला जातीय रंग देण्यात आला.

* निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
> ईव्हीएमला हॅक केले जाऊ शकत नाही.

>  ईव्हीएमपासून दूर राहून त्यात छेडाछेडा केली जाऊ शकत नाही.
>  त्यात ब्ल्यू-टुथ किंवा वाय-फायद्वारे ईव्हीएमचा अक्सेस मिळेल असे कोणताही नेटवर्किंग उपकरण नाही.
>  ईव्हीएममध्ये छेडछाड करायची असेल, तर मशीनच खोलावी लागते आणि मशीन खोलण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी लागते.