कोण हा विनोद पाटील’ त्याचा अन राष्ट्रवादीचा सबंध नाही. 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे, तसेच मराठा क्रांती मोर्चात सक्रिय सहभागी असणारे औरंगाबाद चे विनोद पाटील हे नेमके कोणत्या पक्षात आहे आहे हे अजून बऱ्याच कार्यकर्त्यांना स्पष्ट झालेलं नसून, मराठा मोर्चात ही त्यांनी केवळ प्रसिद्धी साठी पुढाकार घेतला असं बोलल्या जात, या आधी राष्ट्रवादीचे स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या नावाने संस्था सुरु केली. व त्या माध्यमातून त्यांनी काही दिवस सामाजिक कामे ही केली.
दरम्यान मराठा आरक्षण या विषयी विनोद पाटील हे याचिकाकर्ते असून एका पत्रकारांनी अजित पवारांना फोन करून विनोद पाटील यांच्याबद्दल विचारले असता पवार भडकले आणि ‘ कोण हा विनोद पाटील, तो राष्ट्रवादी काँग्रेस चा कार्यकर्ता पण नाही, हे कुणी सांगितलं तुम्हाला आर .आर पाटील जेव्हा ह्यात होते तेव्हा विनोद पाटील त्यांच्या जवळचे होते.

आमचा त्यांचा सबंध नाही विनोद पाटील यांनी आम्हाला विचारून याचिका दाखल केली नाही,’ आहे त्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता समाजातल्या विविध घटकांना आरक्षण मिळाले पाहिजे. कुणाचं ही नाव घेऊन आमच्यावर असे आरोप केलेलं मला चालणार नाही. या आधी विनोद पाटील राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानसभा लढले असता त्यांना मोठा पराभव हाती आला. तसेच आता अजित पवारांच्या वक्तव्यामुळे विनोद पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे नसल्याचे उघड झाले आता २०१९ या निवडणुकीत विनोद पाटील कोणता झेंडा हाती घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.