राणेंच्या १० वर्षांच्या राजकारणात ९बळी घेणारा कोण आहे – विनायक राऊत 

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात १० वर्षांच्या कार्यकाळात ९ जणांचा बळी नेमका कुणी घेतला असा सवाल करत खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीकेचे बाण धनुष्यातून सोडले आहेत. तर म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी नारायण राणे यांचे आवाहन स्वीकारले असून कणकवलीत जाऊन विजयाचे फटाके फोडू असा निर्धार व्यक्त केला आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वाटद गटाचा मेळावा शिवसेनेने आयोजित केला होता. त्यावेळी शिवसेनेचे हे नेते बोलत होते. स्वाभिमानी पक्षाने याच ठिकाणी दिलेले आव्हान शिवसेनेने स्वीकारले असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. नारायण राणे यांच्या वर्मावर घाव बसेल अशी जहरी टीका विनायक राऊत यांनी केल्याने तळकोकणात राजकारण चांगलेच तापले आहे.

नारायण राणे यांनी स्वतःच्या हाताने स्वतःची अशी अवस्था करून घेतली आहे. आमची निष्ठा पैशावर नाही आमची निष्ठा स्वार्थावर नाही आमचे इमान फक्त भगव्या झेंड्याशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशी आहे म्हणून आम्ही तुमच्या समान होऊ शकत नाही असे विनायक राऊत म्हणाले आहेत.

दादरच्या फुटपाथ वर कपबशी विकणारा विनायक राऊत आता भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात जाऊन बसला आहे. या मागे फक्त शिवसेना आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे असे विनायक राऊत म्हणले आहेत. तर म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी विनायक राऊत यांच्या विजयाचे फटाके आपण कणकवलीत जाऊन फोडणार आहे असे म्हणत नारायण राणे यांना प्रतिआव्हान दिले आहे.

नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चांगलाच कलगी तुरा रंगत असल्याचे पाहण्यास मिळते आहे नारायण राणे यांच्या परिवारातील कोण व्यक्ती जर या ठिकाणी उभा राहिला तर या मतदारसंघात निवडणूक चांगलीच घासून झाल्या शिवाय राहणार नाही. तर सेना भाजप युती झाली नाही तर हा मतदारसंघ नारायण राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाला सोडायला भाजप तयार नाही त्याठिकाणी भाजप सुरेश प्रभू यांना उभे करण्याच्या तयारीत आहे.