राज्य मंत्रिमंडळात भाऊ की दादा ?

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार होणार असल्याची चर्चा असून त्यापार्श्वभूमीवर भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांना आज (मंगळवारी) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत तातडीने बोलावून घेतले आहे. बोलावणे आल्याने आमदार लांडगे त्वरित मुंबईला रवाना झाले आहेत. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार लांडगे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार का? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा ही अनेक महिन्यांपासून सुरु आहे. यातच काही दिवसांपूर्वी भाजपचे शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना मंत्रिपद मिळाल्याची चर्चा जोरात झाली. लवकरच मंत्रिमंडळ विस्तारीकरण होणार आणि आमदार जगताप यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सगळीकडे पसरली. दरम्यान आज भोसरी आमदार महेश लांडगे यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तारिकरणाच्या चर्चेसाठी बोलावले असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आमदार लांडगे यांच्या कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबई | राज्यसरकारकडून दुष्काळसदृश्य परिस्थितीची घोषणा

येत्या काही दिवसात हा विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या विस्तारात पिंपरी-चिंचवडमधून भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे या दोघांपैकी एकाची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचे बोलते जात आहे.  त्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांना आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने मुंबईला बोलविले आले आहे. त्यामुळे दादांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार का? याची जोरदार चर्चा भोसरीसह शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेते शहरातील दोन्ही आमदारांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकणार ? किंवा ही नुसतीच चर्चा असणार हे येणाऱ्या काही दिवसातच कळणार आहे.

जाहिरात