सुस्तावलेली संपूर्ण ‘डिबी’च बरखास्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – प्रत्येक पोलीस ठाण्याचे नाक म्हणजे गुन्हे प्रकटीकरण पथक (डिबी) असते. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणारे गुन्ह्यांवर आळा बसवणे, गुन्ह्यातील आरोपी पकडणे, गुन्हे उघडकीस आणण्याचे काम या पथकावर असते. मात्र हे पथक बिनकामी झाले तर मग गुन्हेगारी वाढण्यास चालना मिळाली हे नक्की. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आयटी पार्कमधील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या डीबीची हीच आवस्था झाली होती, मात्र वरिष्ठ अधिकारी त्याकडे कानाडोळा करत होते. मात्र पोलिस आयुक्तांनी केलेल्या फेरबद्दलामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक झालेल्या अधिकाऱ्याने ही परिस्थिती पहिली आणि तडकाफडकी संपर्ण ‘डिबी’च बरखास्त करुन टाकली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’42d87acb-d383-11e8-87ea-fd5898ea1043′]

आयुक्तालयाच्या हद्दीतील हिंजवडी पोलीस ठाणे तसे संवेदनशील आहे. मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्या असलेल्या या भागात छोटी घटना घडली तरी याकडे सर्वांचे लक्ष असते. दररोज लाखो आयटीएन्स या परिसरात नोकरीसाठी ‘अप-डाऊन’ करत असतात. त्यामुळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या हिंजवडी पोलिसांवर आहे. येथूनच मेगा हायवेही जात आहे. ग्रामीणचा मोठा परिसर आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना नेहमीच सतर्क आणि कर्तव्यदक्ष राहावे लागते.

दुष्काळग्रस्तांच्या शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासनाच्या नाकीनऊ

आयटी पार्कच्या हिंजवडीची डिबी अनेक महिन्यांपासून अकार्यक्षम आहे. डिबी पथकाची समाधानकारक कामगिरी नसतानाही वरीस्थांच्या मर्जीमुळे डिबीचे कामकाज सुरू होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी बरेच बदल केले. यामध्ये सर्वात मोठे बदल म्हणजे एकाच दिवशी १५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. यामध्ये हिंजवडीला शिवाजी गवारी यांच्या जागी यशवंत गवारे यांची नियुक्ती केली. यशवंत गवारे यांनीही पदभार स्वीकारल्यानंतर माहिती घेऊन काही बदल केले. यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे अकार्यक्षम डिबी बरखास्त केली. डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना इतरांप्रमाणे कामकाज दिले आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6837e43d-d383-11e8-b419-9fc93c5886ff’]