दीपिका आता ऑनस्क्रीन किसिंगचे सीन थांबवणार ?

मुंबई :वृत्तसंस्था – बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय जोडपं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग विवाह बंधनात अडकल्यानंतर पुन्हा आपापल्या करिअरकडे वळताना दिसत आहेत. रणवीर त्याच्या आगामी ‘सिम्बा’ चित्रपटाकडे वळला आहे.तर दीपिकाही तिच्या आगामी प्रोजेक्टकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान एका मुलाखतीत दीपिकाला एक प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे,  ऑनस्क्रीन किसिंग देणार का ? दरम्यान या प्रश्नानंतर सर्वच उपस्थितांच्या नजरा दीपिकाकडे वळाल्या. तिच्या उत्तराने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

‘दीपिका आता तू रणवीरसोबत विवाहबद्ध झाली आहेस. त्यामुळे आता चित्रपटांची निवड करताना किंवा एखाद्या चित्रपटामध्ये ऑनस्क्रीन किसिंग सीन देणार का ? तसंच तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑनस्क्रीन नो किसिंग क्लॉज असं नमूद करणार का’ ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर दीपिकाने ‘शी.. ‘अशी प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाने सध्या तरी या सीनविषयी कोणताही विचार केला नसल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान याच कार्यक्रमात तिला रणवीरच्या ‘सिम्बा’विषयीही तिचं मत विचारण्यात आलं. यावर तिने आपंल मतंही सांगितली मुख्य म्हणजे रणवीर सध्या त्याच्या आगामी ‘सिम्बा’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे आम्ही आता तरी आमचं पूर्ण लक्ष आमच्या करिअरवर केंद्रीत केलं आहे. ‘सिम्बा’ प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही हनिमून आणि फॅमेली प्लानिंगविषयी विचार करु असं दीपिकाने सांगितलं. दीपिकाने नुकतीच ‘निकलोडियन किड्स चॉइस अॅवॉर्ड २०१८’ सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिला सदर प्रश्न विचारण्यात आले.

दरम्यान, दीपिका लवकरच मेघना गुलजार यांच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित असून दीपिका या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय जोडपं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघंही विवाहबंधनात अडकले आहे. इटलीत पार पडलेल्या या शाही विवाहाची चर्चा गेल्या कित्येक दिवसापासून सोशल मीडियावर होती. लग्नाप्रमाणेच त्यांनी आयोजित केलेल्या वेडिंग रिसेप्शनचीही तेवढीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.