‘पंख न हलवता’ पक्षाने केला 10 हजार कि.मी.चा प्रवास

लंडन : वृत्तसंस्था – पंख न हलवात कधी कोणता पक्षी काही किलाेमीटर अंतर चालून गेल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? नक्कीच असे कधी नसेल ऐकले. कारण असे होणे शक्य नाही आपणाला माहीतच आहे. परंतु एका पक्षाने पंख न हलवताही हवेत तब्बल 10 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. मायना असं या पक्षाचं नाव आहे. विमानात प्रवेश करून या पक्षाने हा प्रवास केला आहे. ब्रिटनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये घुसून या पक्षाने आरामात हा प्रवास केला आहे. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मायना नावाच्या पक्षाने सिंगापूर ते ब्रिटनच्या फ्लाईटमध्ये घुसून तब्बल 10 हजार 864 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. हे अंतर पार करण्यासाठी तब्बल 12 तासांचा प्रवास या पक्षाने केला. यानंतर त्याला लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरवण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या फ्लाईटचा तिकीट दर ऐकून तुम्ही चकितच व्हाल. 4.24 लाख रुपये असा या फ्लाईटचा तिकीटदर आहे. मजेशीर बाब म्हणजे मायना पक्षाने अगदी फुकट हा महागडा प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.

एका प्रवासी सीटच्या मागे बसलेल्या या पक्ष्याचा कुणीतरी व्हिडिओ बनवला यानंतर तो मात्र तो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून आला. एका कर्मचाऱ्याने त्याला पकडण्याचा प्रयत्नही केला परंतु त्याला चकवा देत तो उडाला. या व्हिडिओ तही हे दृश्य टीपले गेले आहे. आधी हा व्हिडिओ फेसबुकवर आला आणि नंतर ट्विटर, यू ट्यूब आणि इन्स्टाग्रामवरही तो शेअर करण्यात आला अशा प्रकारे सर्व ठिकाणी तो व्हिडिओ व्हायरल होताना दिसून आला. काही प्रवाशांच्या मदतीने कर्मचार्‍यांनी त्याला पकडले आणि हिथ्रो विमानतळावर विमान उतरल्यानंतर तेथील अ‍ॅनिमल क्‍वारेंटाईन अ‍ॅथॉरिटीजकडे नेण्यात आले.