तिनं केलं राहुल गांधींना kiss, राहुल गांधी गोंधळले

वलसाड (गुजरात) – वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आला असून प्रत्येक पक्षाची मोटबांधणी जोरदार सुरू असल्याचं दिसत आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने तयारी करत आहे. सध्या उमेदवार निश्चितीची गडबडही सुरू असताना दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थान आणि गुजरातचा दौरा केला. सदर दोन्ही राज्यांमध्ये राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत होताना दिसून आले. परंतु या स्वागतादरम्यान राहुल गांधींना आलेल्या वेगळ्या अनुभवाने ते काही काळ गडबडून गेले. स्वागतादरम्यान एका महिलेने राहुल गांधी यांना किस केले. यामुळे राहुल गांधी काही काळासाठी गडबडलेच.

राहुल गांधी हे गुजरातमधील वलसाडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी काही महिला कार्यकर्त्या स्टेजवर आल्या. यावेळी त्यातील एका महिलेने स्टेजवर आल्या आल्या अचानक राहुल गांधी यांना किस केले. अचानक समोर आलेल्या या प्रसंगामुळे राहुल गांधी काही वेळासाठी गाेंधळून गेले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याची चर्चा सुरु झाल्याचे दिसत आहे. शिवाय याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. सगळीकडे तो व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान पंतप्रधान नेरंद्र मोदींविरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीकेची झोड उठवल्याचे दिसत आहे. प्रसारमाध्यमांपासून जनसभांपर्यंत सगळीकडे राहुल गांधी मोदींवर हल्ला चढवत आहे. भाजपा आणि संघ द्वेष पसरवतो. आम्ही मात्र प्रेमच पसरवतो. मोदी शिव्या देतात. काँग्रेस संपवायची भाषा करतात. मात्र मोदींच्या द्वेषावर माझं प्रेम भारी पडत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. अजमेर येथे सेवादलाला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.