जरा हटके

म्हणून वडिलांनी केले नाही कन्यादान

कोलकता : पोलीसनामा ऑनलाईन  – लग्न म्हणजे आयुष्यातील एक महत्वाचा संस्कार असतो. लोकांकडे मुबलक पैसा असला कि त्याचे लग्न गाजणारच. असा समज सर्वत्र पसरत चाललेला आहे. मात्र पश्चिम बंगालामध्ये एका लग्नात वडिलांनी कन्यादान केले नाही म्हणून गाजला आहे. मुलगी हि संपत्ती नाही म्हणून मी तिचे दान करू शकत नाही असे म्हणत या मुलीच्या वडिलांनी कन्यादान करण्यास नकार दिला आहे. त्या वडिलांचे सोशल मीडियातून कौतुक होत असून त्या वडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

पुरोगामित्वाचा साजेसे हे लग्न झाले असून या लग्नात लग्न लावण्यासाठी महिला पुरोहिताला बोलावले होते. त्याही निर्णयला सोशल मीडियाने आधुनिक निर्णय म्हणून गौरवले आहे.

अस्मिता घोष या महिलेने ट्विटरवर या लग्नाचे फोटो प्रसारित करून या आधुनिक विवाहाबद्दल माहिती दिली आहे. मेरा भारत बदल रहा है अशा कॅप्शन खाली या महिलेने ट्विट केले होते. त्यात त्या महिलेने म्हणले होते कि, मी एका विवाहाला आले आहे त्या ठिकाणी महिला पुरोहित पूजा पाठ करण्यासाठी आल्या आहेत. त्याच प्रमाणे नवरा नवरीचा परिचय करून देताना दोघांच्या वडिलांच्या अगोदर त्यांच्या आई चे नाव घेण्यात आले. त्याच प्रमाणे वडिलांनी मुलगी हि संपत्ती नाही म्हणून मी तिचे दान करू शकत नाही असे म्हणत या मुलीचे कन्यादान करण्यास नकार दिला आहे

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button