बाबो…! बेडवर पत्नी नाही साप, त्याने एवढे मारले…थेट ICU गाठले 

सिडनी : वृत्तसंस्था – सर्वत्रच थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे फॅशन वर्ल्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉक्स, स्वेटर उपलब्ध आहेत. सध्या अ‍ॅनिमल प्रिंट स्टाईल खूपच प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलियातल्या एका महिलेने अशाच प्रकारे थंडीपासून वाचण्यासाठी स्नेक प्रिंट चे सॉक्स घातले होते. विशेष म्हणजे हे सॉक्स इतके तंतोतंत सापासारखे दिसत होते की कुणालाही हे सॉक्स आहेत हे प्रथमदर्शनी कळणारच नाही. पण हे सॉक्स घालणे तिला चांगलेच महागात पडले कारण जेव्हा तिचे डोळे उघडले होते ती चक्क ICU मध्ये होती.
याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, एका महिलेने काळ्या रंगाचे तंतोतंत सापासारखे दिसणारे सॉक्स घातले होते. तेव्हा ती घरी एकटीच होती. ती अशा पद्धतीने पांघरून घेऊन झोपली होती की तिचे सापासारखे मोजे घातलेले पाय फक्त आंथरुणाबाहेर दिसत होते. जेव्हा घरात या महिलेचा पती आला तेव्हा त्याला दोन साप आंथरुणात दिसले. साप समजून महिलेच्या पतीने रुममध्ये ठेवलेली बेस बॉल बॅट उचलली आणि सापांना ठार मारण्यासाठी जोरदार प्रहार सुरू केले. हे प्रहार इतके जोरदार होते की, जेव्हा त्या महिलेच्या पतीला कळाले की हे साप नसून आपल्या पत्नीचे पाय आहेत तोपर्यंत पत्नी बेशुद्ध पडली. तिला गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विशेष म्हणजे ज्या महिलेसोबत ही दुर्दैवी घटना घडली तिने स्वतः याबाबतचे फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर  टाकली आहे. तिचा हा भयानक किस्सा सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. काहीजण तिच्या या घटनेवर खूप हसत आहेत तर काहीजण या घटनेची खिल्ली उडवत आहेत तर काहीजण दुःख व्यक्त करीत आहेत.