…म्हणून त्या महिलेने केली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची धुलाई

जालना : पोलीसनामा आॅनलाइन – जालना येथे अप्पर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील शासकीय वाहनाकडे जात असताना एका महिलेने मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांना अडवून पाठीत बुक्क्यांनी मारहाण केली, अशी फिर्याद अप्पर जिल्हाधिकारी पी. बी. खपले यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पार्वताबाई उत्तम वाकडे (रा.जाफराबाद) या महिलेविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
न्यायदानाच्या कामानिमित्त अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेल्यानंतर त्यांनी पैशाची मागणी केली. माझ्याशी उद्धट वागून शिवीगाळ करून अंगाशी झटापट केल्याचा आरोप पार्वताबाई वाकडे यांनी केला आहे. जाफराबाद येथील गट क्रमांक ७३ मधील ४३ आर जमिनीशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी अप्पर जिल्हाधिकारी पी. बी. खपले यांच्याकडे सुरू आहे. या प्रकरणात गैरअर्जदार असलेल्या पार्वताबाई उत्तम वाकडे (५८ रा. मालेगावगल्ली,जाफराबाद) या प्रकरणाच्या सुनावणीनिमित्त खपले यांच्या दालनात आल्या होत्या. चारच्या सुमारास खपले कामकाजाच्या दालनामधून कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या शासकीय वाहनाकडे जात असताना पार्वताबाई वाकडे यांनी रस्ता अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच खपले यांच्या पाठीत बुक्क्या मारल्या.

याबाबत माहिती मिळताच तालुका ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन महिलेस ताब्यात घेतले. या प्रकरणी खपले यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या महिलेविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम ३५३ व ३४१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली.

सोलापुरात तब्बल ४८ जणावर होणार तडीपारची कारवाई