प्रतापगडाच्या कडेलोट पॉईंटवरून महिलेची आत्महत्या

प्रतापगड (सातारा) : पोलीसनामा ऑनलाईन

किल्ले प्रतापगडाच्या कडेलोड पॉईंटवरून महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने प्रतापगड परिसरात खळबळ उडाली आहे. मयत महिला ही मुंबईची असून ती पतीसमवेत किल्ले प्रतापगडावर पर्यटनासाठी आली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d3ba8a6-c7e7-11e8-b7b1-4ddd472de280′]

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गद्दारी करणार्‍याला अठराशे फूट खोल दरीत फेकुन देण्याची शिक्षा दिली जात होती. किल्ले प्रतापगड येथे पर्यटनासाठी येणारे पर्यटक या पॉईंटला भेट देतात. गुरुवारी सकाळी कडेलोट पॉईंटवरुन उडी घेऊन महिलेने आत्महत्या केली आहे.
[amazon_link asins=’B01GNX31US,B01LYHW5QV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bddefb2f-c7e7-11e8-b99e-71c4ab0dd150′]

या महिलेची चपल, पर्स घटनास्थळावरुन मिळून आली आहे. पर्समध्ये मतदान ओळखपत्र व आधार कार्ड मिळून आले आहे. संशयीत महिलेचे नाव ज्योती नवनीत बल्लाळ असे  असून या महिलेसोबत एक इसम असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी प्रतापगड पोलिस पोहचले असून महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण करण्यात आले आहे.

आमदार राहुल कुल यांच्या जीविताला धोका असल्याची अफवा पसरवणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ


सिगारेट आणून न दिल्याने भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला 

मुंबई : चेंबूर परिसरात सिगारेट आणून देण्यास नकार दिल्याच्या रागातून चार सराईत आरोपींनी एका भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. कमलेश रामेश्वर जाधव (वय ३३), अहमद हुसेन नबी हुसेन खान उर्फ गुड्डू (वय ३५) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील दोन आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. चेंबूरच्या इंदिरानगर परिसरातील चेंबूर कॅम्प परिसरात शिवालाल गुप्ता हा १९ वर्षीय तरुण भाजी विक्रेता आहे. सोमवारी कमलेश रामेश्वर जाधव (वय ३३), अहमद हुसेन खान, मनिष कोंडवळकर आणि अक्रम हे सराईत आरोपी दारू पिवून तिथे आले होते. सर्व नशेत असल्यानं त्यांनी गुप्ताला जवळील टपरीहून सिगारेट आणण्यास सांगितले. दरम्यान, भाजी विक्रेत्याकडे भाजी खरेदीसाठी गर्दी केली. तेव्हा गुप्ताने जाण्यास नकार दिला. यावरून त्या चौघांनी गुप्ताला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद इतका टोकाला गेला की या चौघांनी स्वतःजवळील चाकूने गुप्तावर गंभीर वार केले. या हल्ल्यात गुप्ता हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर या चौघांनी घटनास्थळाहून पलायन केले.