लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

(प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मोहिता गोयल मदरहूड हॉस्पिटल खराडी)

जगभराचा विचार करता गर्भाशयाचा कर्करोग हा चौथ्या क्रमांकावर आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा प्राथमिक जोखीम घटक आहे. हा सर्व्हायलकल स्पाइनचा कर्करोग आहे अशी गैरसमजूत होऊ शकते. हा कर्करोग महिलेच्या योनीमार्गातून गर्भाशयाच्या प्रवेशद्वारापाशी म्हणजेच सर्व्हिक्सपाशी (ग्रीवा) हा कर्करोग विकसित होतो. या पूर्वी ३० वर्षांवरील महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक होतेआता मात्र विशीतच हा आजार जडण्याचे प्रमाण वाढले आहे. ३०-४५ या वयोगटातील लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या महिलांना हा विकार होतो. अनेक तरूण मुली कमी वयात लैंगिकदृष्ट्या सक्रिय होत असल्यामुळे हा आजार होण्याचा धोकाही वाढला आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा समागमादरम्यान एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पोहोचतो. लैंगिक दृष्ट्या सक्रिय असलेल्या प्रत्येक महिलेला गर्भाशयाचा कर्करोग होईलअसा याचा अर्थ नव्हे. कारण एचपीव्हीचे अनेक निरुपद्रवी उपजती असतातज्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होत नाही. एचपीव्ही-१६ आणि एचपीव्ही १८ या घटकांमुळे हा कर्करोग होतोअसे आढळून आले आहे.

बहुतेक आजारांप्रमाणेच याही आजारासाठी इम्युनोसप्रेशन संबंधित आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक शारीरिक स्वच्छता करून या आजाराला प्रतिबंध करता येऊ शकतो. या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. लैंगिक समागमादरम्यान किंवा नंतरदोन मासिक पाळ्यांमधील कालावधीत किंवा रजोनिवृत्तीनंतर होणारा असाधारण रक्तस्त्राव हे पुढील टप्प्यातील गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण आहे.

गर्भाशाच्या कर्करोगाबद्दल महत्त्वाचा पैलू हा कीविविध चाचण्या आणि एचपीव्हीच्या संसर्गाला प्रतिबंध करणार लसीकरण उपलब्ध असल्याने या आजाराल प्रतिबंध घालता येऊ शकतो. गर्भाशयाच्या कर्करोगावरील उपचारांना मिळणाऱ्या यशाचे प्रमाण खूप आहे आणि लवकर निदान व सुयोग्य उपचार व औषधांमुळे यावर यशस्वी उपचार करता येतात.

तातडीने उपचार केल्यास या दीर्घायुष्य व उत्तम जीवनमान असणे शक्य आहे. २० वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक तरुणीने आणि महिलेने पॅपस्मिअर आणि एचपीव्ही चाचणी करून घेणे हितकारक आहे आणि दर ३-५ वर्षांनीविशेषतः स्त्री लैंगिकदृष्ट्या सक्रिय असेल तर ही एकदा ही चाचणी करून घ्यावी.

शारीरिक संबंध आल्यास या विषाणूचा संसर्ग होणे शक्य आहे. त्यामुळे असुरक्षित संभोग करू नयेत. त्याचप्रमाणे अनेक जोडीदारांशी लैंगिक संबंध टाळल्यास या रोगाची जोखीम कमी करता येऊ शकते. एचपीव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्यास गर्भधारणेचे नियोजन करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हितकारक असेल. एचपीव्हीला लसीकरणाने प्रतिबंध करता येऊ शकतो. काही देशांमध्ये १२ ते १३ या वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येते. गर्भाशयाच्या कर्करोगाबाबतची प्राथमिक माहिती शालेय पातळीवर देणे आवश्यक आहे.

गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान लवकर झाले तर शस्त्रक्रिया करून हा आजार बरा करता येऊ करतो. काही प्रकरणांमध्ये हिस्टेरेक्टोमी करण्याचा सल्ला देण्यात येतो. कर्करोग पुढील टप्प्यात गेल्यास निश्चित परिणाम साधण्यासाठी शस्त्रक्रियेसोबतच केमोथेरपी आणि रेडिएशनचा सल्ला देण्यात येतो.