महिला शिक्षणाधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

सातारा:पोलीसनामा ऑनलाईन

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला फरक बिल मंजूर करण्यासाठी ते शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना भेटले. बिल मंजूर करण्यासाठी गुरव यांनी त्‍यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याची तक्रार अर्जदार शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली असता, तक्रारीनुसार पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी आज (सोमवार) सांयकाळी सापळा लावून दहा हजार रूपयांची लाच घेताना शिक्षणाधिकारी गुरुव यांना रंगेहाथ पकडले.