मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू, साताऱ्यातील दुर्घटना

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन – दोन कामगार संरक्षक भिंतीच्या बांधकामावर काम करत असताना अचानक मातीचा भराव कोसळला आणि या ढिगाऱ्याखाली ते दबले गेले. या दुर्घटनेत या दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये घडली आहे. दस्तगीर अब्दुल दिड्डी (४४) व त्यांचे जावई मुस्तफा दस्तगीर बल्लोरगी (२४) अशी मृत कामगारांची नावे आहेत. हे दोघे कर्नाटक राज्यातील रहिवासी असून कामासाठी ते महाबळेश्वरमध्ये आले होते.

२ लाखांचे लाच प्रकरण : गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हवालदाराला पुण्यात अटक 

महाबळेश्वरजवळील रांजणवाडी येथे एका घरा शेजारी संरक्षण भिंतीचे काम मागील ४ दिवसांपासून सुरू होते. संरक्षण भिंतीसाठी ७ ते ८ फूट खोल खड्डा खोदल्यानंतर त्या जागी लोखंडी सळ्या जोडण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कामगारांच्या अंगावर कोसळला आणि या ढिगाऱ्याखाली दिड्डी आणि त्यांचे जावई मुस्तफा दबले गेले. या घटनेत जखमी कामगार सुदैवाने बचावला. वाचलेल्या या कामगाराने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण खुप वेळ गेल्यामुळे दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कर्नाटकातील विजापूर येथील कामगार मोठ्या संख्येने महाबळेश्वर परिसरात माती काम करतात. दिड्डी आणि बल्लोरगी हे पाचगणी येथे वास्तव्यास आहेत आणि तेथूनच महाबळेश्वरला कामासाठी ये-जा करत असतात.
इमारतीचे बांधकाम करताना गवंडी अथवा कामगारांना सुरक्षेसाठी शिरस्त्राण, सुरक्षा पट्टा, बुट, हातमोजे आदी साहित्य देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जीवितहानी टाळता येऊ शकते. तसेच काम करताना एका कामगाराचा मृत्यू झाल्यास त्या कामगाराच्या नातेवाईकांना विमा रक्कम देण्याचीही मागणी होत आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.