तरूण दिसायचं आहे ? मध आणि बदामाचे असे करा सेवन 

वृत्तसंस्था – आपण अनेकदा पाहतो की लोक बदाम खाण्याचा सल्ला देतात. अनेक डाॅक्टरांकडूनही याबाबत वेळोवेळी सांगतिले जाते. परंतु अनेकदा या गोष्टींकडे आपण कानाडोळा करतो. योग्य ती पद्ध फाॅलो करत नाही. यामुळे कसे सेवन केल्याने कसा फायदा मिळतो हे आपल्याला माहीतच नसते. आयुर्वेदामध्ये बदाम आणि मध दोघांनाही औषधी मानले गेले आहे. यांच्या वेगवेगळ्या सेवनाने अनेक फायदे होतात. तुम्हाला कदाचित माहीत नसेल परंतु बदाम आणि मध यांच्या एकत्रित सेवनाने अनेक मोठे फायदे आपल्याला मिळतात. यात अँटीएजिंग गुणधर्म असतात. त्यामुळे तरूण दिसायचे असेल तर या फाॅर्म्युल्याचा वापर नक्की करा.
भोपाळचे आयुर्वेदिक तज्ञ डॉ. अबरार मुलतानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते सांगतात की, ‘हे दोन्ही पदार्थ अत्यंत लाभदायी औषधी आहेत. यांमध्ये भरपूर पोषक तत्त्व असतात. अँटीऑक्सीडंट, अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीएजिंग गुणधर्म असतात. आपण जर १ महिना रोज मधात भिजलेले 3 बदाम खाल्ले तर त्यामुळे अनेक फायदे मिळतील. तुम्ही मधामध्ये बदामाला भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता किंवा ते भिजवत ठेवण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही बदाम आणि मध दोन्ही एकत्रितपणे खाऊ शकता. या दोन्हींच्या एकत्रित सेवनाने पुढील फायदे होतात.

– मध आणि बदाम यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होईल तसेच ह्रदयही निरोगी राहील.
– मेंदूसाठी हे एक टॉनिक आहे. यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते.
– एजिंगला थांबवते व त्वचा निरोगी ठेवते. तरूण दिसण्यास विशेष मदत होते.
– यातील अँटीअॅलर्जिक आणि अँटीबॅक्टेरिअल गुणांमुळे घशाचे आणि फुप्फुसाचे आजार दूर राहतात. इन्फेक्शनपासून तुम्ही दूर राहता.
– जीम करणाऱ्यासांठी याचा खूपच फायदा होतो. प्रोटीनचा उत्तम सोर्स असल्यामुळे स्नायू मजबूत आणि सशक्त बनतात. यामुळे              अशक्तपणा दूर होतो. फक्त जीम करणारेच नाही तर सर्वांनीच याचा लाभ घ्यावा कारण स्नायू मजबूत राहण्यासाठी सर्वांनाच प्रोटीनची    आवशकता असते.
– केसांना मजबूती मिळण्यासाठी याची कमालीची मदत होते. अनेक मिनरल्स आणि विटॅमिन्स यातून शरीराला मिळत असतात.
– बदाम आणि मध यांचे सेवन तुमच्या डोळ्यांची शक्तीही वाढवतात. त्यामुळे तुम्हाला चष्म्यापासून दूर राहण्यास याची विशेष मदत होते.    प्रकाशाचाही डोळ्यांना जास्त त्रास होत नाही. कारण आपली दृष्टीच कमजोर असेल तर याचा आपल्या जीवनावर चांगलाच परिणाम        होतो. डोळे हे आपल्या शरीराचे अत्यंत नाजूक अवयव असून खूप महत्त्वपूर्ण आहे.