107 वर्षांची महिला क्रिकेटपटू – काय आहे जगण्याचे रहस्य ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल सर्वच फिटनेसविषयी काळजी घेताना दिसतात. अनेक जण जीमला जातात, कोणी जाॅगिंग तर कोणी माॅर्निंग वाॅकला जातो. याहीपेक्षा काही जण योगाचा मार्ग निवडताना दिसतात. कारण या या धकाधकीच्या जीवनात आपण किती वर्ष जगू शकतो, हे ठामपणे कुणीही सांगू शकत नाही. एखादी व्यक्ती वयाच्या वृद्धावस्थेतही पूर्ण फिट असेल तर तरुणांना याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. असेच एक उदाहरण आपण पाहणार आहोत. तुमच्या जन्मापूर्वी या जगात आलेली एक व्यक्ती अजूनही फिट आहे, हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ही व्यक्ती एक महिला असून त्यांचे वय 107 वर्ष आहे. विशेष बाब अशी की, या महिला क्रिकेटपटू आहेत.
इलिन अॅश असं या  महिला क्रिकेटपटूचे नाव आहे. तब्बल 107 वर्ष असणाऱ्या अॅश या इंग्लंडच्या माजी महिला क्रिकेटपटू आहेत. वय 107 असूनही त्या पूर्णपणे फिट आहेत. या साऱ्या गोष्टीचे श्रेय त्यांनी योगाला दिले आहे.
अॅश यांनी 1937 साली इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या गोष्टीला 2017 साली तब्बल 80 वर्षे पूर्ण झाली होती. त्याचवेळी महिलांचा विश्वचषकही खेळवला जात होता. या निमित्ताचे औचित्य साधून सामन्यापूर्वी घंटानाद करण्याचा मान अॅश यांना देण्यात आला होता.
काय आहे योगाचा फायदा ?
शरीराला तंदुरूस्थ ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी. नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तर, योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर, योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय. आपण तरूण असतो. तरूण असताना प्रकृतीही साथ देत असते. त्यामुळे शरीर कोणत्याही किरकोळ तक्रारी, आजाराशी झुंजायला तयार असते. पण, जसजसे वय वढू लागते तसतसे शरीरावर मर्यादा येतात. पण, तुम्ही जर सुरूवातीपासूनच योगा करत असाल तर, तुमची ही साधना वृद्धापकाळात कामी येऊ शकते. वृद्धापकाळात आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यसाठी नियमित योगा करा.