राजकीय

पिंपरी चिंचवडच्या शहर युवक कार्याध्यक्षपदी योगेश गवळी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – माजी उपमुख्य्मंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे निष्ठावान उद्योजक पंडीत गवळी यांचा मुलगा योगेश गवळी यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहर युवकच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तशी अजित पवार यांची तयारी जोर घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे युवकांची संघटना बळकट करण्यासाठी ते विशेष काळजी घेताना दिसत आहेत.

पुण्यात बुधवारी (9 जानेवारी) अजितदादांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडच्या आजी-माजी नगरसेवकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी. निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाचे जीव तोडून काम करणारे युवक कार्यकर्ते एकत्र करण्याची जबाबदारी युवकांची असल्याचं त्यांनी सांगितलं. इतकेच नाही तर, महापालिकेत चाललेल्या चुकीच्या कामावर अंकुश ठेवण्यात व बूथ कमिटी नेमण्यात युवकांनी जास्त योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. युवक कार्यकर्ते एकत्र करण्याच्या दृष्टीकोनातून शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या बरोबर काम करण्यासाठी युवक कार्याध्यक्षपदी योगेश गवळी यांची निवड केली आहे.

योगेश गवळी यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते म्हणाले की, “शहराचा विकास हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झाला आहे. विकास साधण्याची धमक केवळ राष्ट्रवादीमध्ये आहे. पक्षाच्या हितासाठी नाराजी बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याचा युवकांचा प्रयत्न राहील. तसेच युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी खात्रीशीर प्रयत्न केले जातील.”आता युवक कार्याध्यक्षपदी योगेश गवळी यांची नियुक्ती केल्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षात आलेली मरगळ दूर होण्यात नक्कीच मदत होणार आहे. असे मत व्यक्त केले जात आहे.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे, वैशाली काळभोर, नाना काटे, पंडीत गवळी, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विशाल वाकडकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संजय वाबळे आदि सर्व विद्यमान नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या